खरे योद्धा

आजच्या या कोरोना ग्रस्त परिस्थितीत प्रत्येकालाच विविध अनुभव येत आहे. व जीवन जवळून बघता येत आहे.

मागील आठवड्यातील प्रसंग आहे. दुपारी 3 च्या सुमारास घराच्या दरवाज्याची घंटी वाजली. मी दरवाजा उघडला. एक महिला खांद्यावर बॅग, तोंडाला मास्क, कोमेजलेले शरीर आणि हातात काही वेगवेगळ्या रंगाचे कागदाचे तुकडे घेऊन उभी होती ,घामाने भरलेले कपाळ आणि जिना चढून आल्यामुळे आलेला दम टाकत मला विचारत होती.काय नाव तुमचे ? रिमा का ? असा तिने प्रश्न विचारला.

मी म्हटले नाही मीना ती नम्रपणे म्हणाली, माफ करा नावात चूक झाली वाटते. हे घ्या तुमचे कार्ड तुम्ही आठवड्यातून एक दिवस बाहेर जाऊ शकता. मी ते निळ्या रंगाचे कार्ड हातात घेताच तिला पाणी विचारले आणि ती पाणी पिऊन निघून गेली.

तिने दिलेले कार्ड मी हातात घेऊन वाचायला लागले. त्यावर बुधवार होता म्हणजे मी बुधवारी बाहेर जाऊन जीवनावश्यक वस्तू घेऊ शकते हे त्यातून नमूद होत होते.

मी तिला पुन्हा बघण्याकरिता घराच्या बाल्कनीत गेले. मी निशब्द होऊन तिला बघत राहिले तर ते तेवढ्याच लगबगीने ते कार्ड घरोघरी पोहोचवण्या करिता दुसऱ्या बिल्डिंगचा जिना तेवढ्याच जिद्दीने चढू लागली व माझ्या नजरेआड झाली.

मी घरात येऊन ते कार्ड पुढे वाचायच्या आतच माझ्या डोक्यात सारखा त्या महिलेचाच विचार येत होता की,मे महिन्याच्या कडक तप्त उन्हात चंद्रपूर सारख्या शहरात (भारतातील सर्वात उष्ण शहर) दुपारी 3 वाजता ती महानगरपालिके ची कंत्राटी महिला कामगार ,ते कार्ड मला माझ्या घरी आणून देते.कशासाठी ,तर मला एक दिवस सुरक्षित बाहेर जाऊन जीवनावश्यक वस्तू घेता याव्यात म्हणून…

जे कुठल्याही परिस्थितीची पर्वा न करता उन्हातानात आपल्यासाठी दिवस-रात्र कार्य करीत आहेत हेच आहेत खरे योद्धा.

सलाम अशा योद्ध्यांना…

12 thoughts on “खरे योद्धा

 • May 16, 2020 at 7:11 am
  Permalink

  Nice Tai. Khup Chan Lihl.

  Reply
  • May 17, 2020 at 3:20 am
   Permalink

   खर आहे ताई आज आपन ह्या योद्धान मुळेच सुरक्षीत आहोत आणि त्यांचा सन्मान आणि आदर करने हे आपले कर्तव्य नसून ऐक परम भाग्य सुधा आहे
   आणि अशा योद्धा ना माझा मानाचा मुजरा 🙏

   Reply
 • May 16, 2020 at 4:18 pm
  Permalink

  अश्याच काही लोकांमुळे आपला देश कोरोनाच्या संसर्गातून बाहेर पडेल… नाही तर जमात सारखे लोकांमुळे विनाश निश्चित होता… Salute to all NATIONAL HEROS…

  Reply
  • May 17, 2020 at 12:13 pm
   Permalink

   खुप मस्त अनुभव टिपला आहे
   खरोखरच ते सर्वजण योद्धे आहेतच

   Reply
 • May 17, 2020 at 7:20 am
  Permalink

  सुंदर लिहिले… यंत्रणा जरी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत असली तरी, जनता त्याला साथ देत नाहीत, त्यामुळे यंत्रणा सपशेल कुचकामी असल्यासारखे वाटून जाते, यंत्रणा 100%कार्य करेलच पण लोकांची साथ सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावते. खरं तर हा सर्व खटाटोप का सुरू आहे, लोकांसाठीच ना!! देश आपल्यासाठी काय करतो यापेक्सा आपण देशासाठी काय करू शकतो, खारीचा वाटा आपलाही असावा. Keep it up madam.. लिहत राहा ,लिहत राहा

  Reply
 • May 20, 2020 at 2:58 am
  Permalink

  Sadyachya ghadamodinkade barakaine baghun lihilel likhan aahe…khup chan

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami