क्षण

आयुष्यातील प्रत्येक क्षण जगताना एका विशिष्ट क्षणाला सुचलेली ही कविता…

क्षण हा सुरुवातीचा असतो क्षण हा शेवटचा असतो.

क्षण हा सुखाचा असतो क्षण हा दुःखाचा असतो.

क्षण हा यशाचा असतो क्षण हा अपयशाचा असतो.

क्षण हा प्रेमाचा असतो क्षण हा विरहाचा असतो.

क्षण हा येणारा असतो क्षण हा जाणारा असतो.

क्षण हा आठवाय चा असतो क्षण हा विसराय चा असतो.

क्षण हा इतिहास घडवण्याचा असतो क्षण हा इतिहास तेवत ठेवण्याचा असतो.

क्षण हा विजयाचा असतो क्षण हा पराजयाचा असतो.

क्षण हा प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा असतो क्षण हा ध्येयप्राप्तीचा असतो.

क्षण हा तारुण्या चा असतो क्षण हा वृद्ध काळातील असतो.

क्षण हा काहीतरी देणारा असतो क्षण हा काहीतरी नेणारा असतो.

क्षण हा भितीचा असतो क्षण हा मोकळा श्वास घेण्याचा असतो.

क्षण हा जगण्याचा असतो क्षण हा मरण्याचा असतो.

म्हणून च आयुष्यातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचाच असतो.

9 thoughts on “क्षण

  • May 18, 2020 at 1:32 am
    Permalink

    खूपच अप्रतिम कविता…. क्षणाची वास्तविकता लयबद्ध शब्दात आपण मांडली. फारचं सुंदर …..

    Reply
  • May 18, 2020 at 1:57 am
    Permalink

    Nice tai 👌

    Reply
    • May 18, 2020 at 11:57 am
      Permalink

      Khup sundar tai…aaj kal chya bhitimay vatavarnat lok aajcha kshn jagayalch visrlet.

      Reply
  • May 26, 2020 at 10:41 am
    Permalink

    Aayushatil pratek kshan mahatvache ahet….
    Anandi jeevan tevhach asel jevha apan pratek kshan jagu….

    Khup sundar

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami