मानसिक स्वास्थ्यासाठी….!

आज लॉक डाऊन चा 56 वा दिवस. या लॉक डाउन च्या काळात सतत घरातच राहत असताना, व घरचेच अन्न सेवन केल्यामुळे शारीरिक आरोग्य तर उत्तम राखल्या जात आहे.पण मानसिक आरोग्याचे काय…..?

सतत घरातच राहून राहून मनावरील ताण तणाव वाढत आहे. स्वभावात चिडचिडेपणा येत आहे. मन उदास झाले आहे .काय करावे ? हेच कळत नाही आहे. दिवसेंदिवस टीव्हीवरील बातम्या पाहून पाहून व वर्तमानपत्रातील घटना- दुर्घटना वाचूनही मन खिन्न होत आहे.समाजातील गरिबांच्या वेदना पाहून तर मन संपूर्णता हेलावून जात आहे .

मन निराश होत आहे. मानसिक नैराश्य वाढत चालले आहे.भविष्याची फारच चिंता वाटायला लागली आहे.बैचेनी वाढत आहे ,मन अस्वस्थ होत आहे.

कामधंदे बंद असल्यामुळे सर्वत्र आर्थिक चणचण जाणवत आहे. हातात पैसा नसल्यामुळे लोकांचा धीर सुटत चालला आहे. आर्थिक संकट कोसळल्यामुळे दिवसेंदिवस व्यक्तीचे मानसिक स्वास्थ बिघडत आहे.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता मानसोपचार तज्ञ डॉ.किरण देशपांडे सर यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून मिळालेला मोलाचा सल्ला आणि मानसिक स्वास्थ टिकवून ठेवण्याकरिता महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत share करीत आहे.

* एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करणे टाळावे.

* मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.

* आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नये.

* सामाजिक स्तरावरील दुःखद घटनांची अवास्तव चिंता करू नये.

* वारंवर त्याच त्याच बातम्या बघणे टाळावे.

* जास्त चिंता वाढवतील अशा विषयावर (प्रत्यक्षात किंवा फोनवर )कमीत कमी चर्चा करावी.

* सकारात्मक विचार करावा.

* कोरोना फोबिया (भीती )टाळावा.

* लहान मुलांसोबत वेळ घालवावा त्यांना गोष्टी सांगाव्यात त्यांच्या गोष्टीही ऐकाव्यात.खेळावे, नाचावे,त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुमच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

* योगा,प्राणायाम,व्यायाम करावा.आपले छंद जोपासावे.

* स्वतः ची व व आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी. यासाठी कुटुंबात सुसंवाद राखावा.

* उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालू नये.

* तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे करावे असे केल्याने मन हलके वाटेल. व चिंता कमी होईल.

* हे संकटकालीन दिवसही जाऊन नवीन चांगले दिवस येतील.यावर पक्का विश्वास ठेवावा.

* पर्यायी रोजगार शोधून आर्थिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.

* येणाऱ्या परिस्थितीला समोरे जाण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता ठेवावी.

* सर्वांना पुढील आयुष्यासाठी आणि मानसिक स्वास्थ उत्तम राखण्यासाठी सदिच्छा.

धन्यवाद –

19 thoughts on “मानसिक स्वास्थ्यासाठी….!

 • May 19, 2020 at 1:42 am
  Permalink

  Barobar sangital Tai.

  Reply
   • May 26, 2020 at 10:33 am
    Permalink

    Khup sundar ani agadi barobar.
    If health is lost, everything is lost….

    Reply
 • May 19, 2020 at 1:59 am
  Permalink

  Khup sundar sangitale Tai Tumi 👌👌

  Reply
 • May 19, 2020 at 2:01 am
  Permalink

  आजचा लेख खूपच सुंदर आहे . लॉक डाऊन च्या काळात मानसिक नैराश्य आलं हि वास्तविकता आपण फारच अप्रतिम मांडलं. आणि त्या वर सांगितलेल्या उपाययोजनेचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. खूप भारी .. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ..

  Reply
 • May 19, 2020 at 4:05 am
  Permalink

  वा ! छान

  Reply
  • May 23, 2020 at 2:17 pm
   Permalink

   मीना तू ख़रच खुप चांगली सुरवात केली आहे, लॉक डाउन मधे बरेच लोंकांची मानसिकता अशिच आहे, याचा नक्की फायदा होइल

   Reply
 • May 19, 2020 at 4:19 am
  Permalink

  सकारात्मक विचार करण्यासाठी तुझा लेख प्रेरणादायी आहे

  Reply
 • May 19, 2020 at 7:42 am
  Permalink

  Khup chan everyone can accept the truth & reality of life. Now it’s time to find ourself & the Artist hidden in it..

  Reply
 • May 20, 2020 at 11:08 am
  Permalink

  उपयोगी माहिती आणि सुंदर लिखान

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami