On duty….24 तास

नागपूर येथून स्पर्धा परीक्षेचा पेपर देऊन लालपरीने चंद्रपूरला येत होती.माझ्या सिटवरच बाजूला महाविद्यालयीन युवती ती जेमतेम 22 वर्षाची असेल.ती मुलगी मला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करीत होती .हे मला तिच्या हावभावातून कळले.तितक्यात माझा मोबाईल खणखणला , मी पर्समधून फोन काढला. माझ्या मुलीचा कॉल होता . मुली सोबत फोनवर बोलून मोबाईल बंद करून पुन्हा पर्समध्ये ठेवला.आणि मीच तिला विचारले.

कुठे चालली ग ? ती म्हणाली ,चंद्रपूरला

युवतीने मला विचारले,मॅडम तुम्ही नोकरी करता का? मी म्हटले ,नाही ग, सध्यातरी गृहिणीच आहे.

हा प्रश्न विचारणारी ती पहिलीच नव्हती.यापूर्वीही मला अनेक महिलांनी,युवतीने उपरोक्त प्रश्न विचारला होता.

नोकरदार महिला आणि गृहिणी…

या दोन शब्दातील द्वंद्व माझ्या मनात सुरू होते.

नोकरी ही 8 तासाची परंतु गृहिणी चे काम हे 24 तासाचे ,सतत कुटुंबासाठी झटणारी ती कधी सासू-सासर्‍यांची सून म्हणून कधी नवऱ्याची बायको म्हणून तर कधी मुलांची आई म्हणून स्वतःची स्वप्ने बाजूला सारून कुटुंबातील सदस्यांची मने जपून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सारखी झटत असते.

गृहिणीच्या कामाचे मोल तरी किती….. शून्यच

चार भिंतीच्या आत सारखी राब राब राबणारी ती तिला कधी सुट्टी नाही, कामाचे निश्चित तासही नाही,किंवा पगारही नाही,तरी ती तक्रार न करता निमुटपणे आपले कर्तव्य बजावत असते.

कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांची गाठोडे बांधून ठेवते.स्वतःला एखादा छंद आहे ,हेही ती विसरून जाते. व कधी छंद पूर्ण करण्याची इच्छाही व्यक्त करीत नाही. जर आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीला तिचा छंद बाळगता आला.तर आपल्या देशातील आणखी खूप टॅलेंट जगासमोर येईल,कारण प्रत्येकच स्त्रीला काहीना काही छंद असतोच,परंतु घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना तिचा छंद कुठे मागे सुटून जातो ते त्या स्त्रीलाही कळत नाही.

सण, उत्सव,समारंभातही हसत मुखाने अंगावर ध्येय घेऊन सर्वांसोबत उभी राहते .यावरून ही कुणी बाहेरच्यांनी विचारले, की तुम्ही काय करता ?तर उत्तर असते -‘काहीच नाही करत ‘म्हणजे 24 तास काम करूनही त्या कामाचे मूल्य मात्र काहीच नाही. .

नोकरदार महिला ही ऑफिस मधून 8 तास काम करून जेव्हा घराच्या दाराचा उंबरठा ओलांडून घरात येते.तेेव्हा पुन्हा तिच्या जबाबदाऱ्या सुुरू होतात ते दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याच्या वेळेपर्यंत हे संपतच नाही.

आज कालच्या लॉक डाऊन च्या काळात तर तिचे काम हे दुपटीने वाढले आहे. कारण घरातील सर्व सदस्य घरीच असल्यामुळे तिच्या कामातही प्रचंड भर पडलेली दिसते.तरीही ती न थकता सर्वांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी पूर्ण करत असते.

अशी ही स्त्री एखाद्या सैनिका प्रमाणे 24 तास तटस्थ राहून आपले घर सुरक्षित ठेवण्यासाठी सतत झटत असते.परंतु आजही तिच्या या कामाची किंमत पाहिजे तशी होत नाहीच.

आणि तिला या कििंमती ची अपेक्षाही ही नाही. तिला अपेक्षा असते ती केवळ थोडे प्रेम, आपुलकी, व कौतुकाचे दोन शब्द ….

यावरच, ती आणखी उत्साहाने, हसत मुखाने पुन्हा आपल्या आयुष्यातील नवीन दिवसाची नव्याने सुरुवात करते.

धन्यवाद

15 thoughts on “On duty….24 तास

 • May 21, 2020 at 12:59 am
  Permalink

  खूप छान …. वास्तविक सत्य. आणि मनाला हेलावून सोडणारे हृदयस्पर्शी शब्दरचना. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

  Reply
 • May 21, 2020 at 1:51 am
  Permalink

  Tai lihitana Marathi Grammar Chan use krt ahat.Aj davnd davnd samas use kela .

  Reply
  • May 21, 2020 at 3:43 am
   Permalink

   आपण मराठीचा अभ्यास खूप केला आहे ना म्हणूनच ग्रामर छान जमत असेल ग बाकी काही नाही

   Reply
 • May 21, 2020 at 3:28 am
  Permalink

  khup chan 👌

  Reply
 • May 22, 2020 at 11:05 am
  Permalink

  वास्तविकता आणि सत्यता दिसून येतु तुझ्या लिखनामधून, तू जे काम करते त्या कामाच मोल कोणीही ठरवु शकत नाही, जे काम तू करते त्यात जर आनंद मनला तर नक्कीच आयुष्य सुखकर होईल.

  Reply
  • May 22, 2020 at 12:42 pm
   Permalink

   Thank u so much sagar
   तुझ्या प्रेरणादायी प्रतिक्रिया बद्दल

   Reply
 • May 24, 2020 at 8:51 pm
  Permalink

  स्त्री जीवनातील वास्तवीक्ता,सुरेख

  Reply
 • May 26, 2020 at 10:39 am
  Permalink

  Khupch sundar… Aagadi barobar.. 🙂

  Reply
 • June 4, 2020 at 8:24 am
  Permalink

  अगदी खरं आहे…. खरं तर ही पोस्ट प्रत्येक अहंकारी पुरुषांपर्यंत पोहोचली पाहिजे….. *स्त्री च महत्व किती आहे हे पुरुषांनी आणि स्त्रीनेही ओळ्खल्यास चित्र वेगळं असेल* …..

  मनातून खूप खूप धन्यवाद मॅडम… *तुमची ही पोस्ट निव्वळ पोस्ट नसून एक परिवर्तनवादी विचार आहे* …..

  अश्याच समाजात बदल घडवून आणणाऱ्या पोस्ट आपण लिहून समाजात परिवर्तन करीत राहावे हीच सदिच्छा…..

  *खरोखरच, बेरोजगारी, महाग शिक्षण, स्टॅंडर्ड of लिविंग इ इ विषयावरील आपल्या लिखाणाची आतुरतेने वाट बघतोय* 💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍

  खूप छान लिखाण केले खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami