विद्यार्थी मनाची वेदना…

सरकारने या आर्थिक वर्षात पदभरती बंद केल्याचा जीआर काढला. अन् माझे मन सुन्न झाले. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करू , कळतच नाही आहे …

घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अभ्यासासाठी मला शहरात ठेवले ,आता मी त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू,कळतच नाही आहे…

काबाडकष्ट करून आवश्यक त्या सर्व गोष्टी त्त्यांनी मला पुरविल्या, आता मी त्यांच्या स्वप्नांची पूर्ती कशी करू , कळतच नाही आहे …

इतके वर्ष मी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केला आणि आता कोठे खाजगी नोकरी शोधू , कळतच नाही आहे …

इथे प्रत्येक जण आप आपल्या समस्येत गुंतलेले असताना, हा बेरोजगारीचा प्रश्न मी कुठे मांडू कळतच नाही आहे…

डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरूच आणि मन भरून येत असताना ,माझ्या आसवांची वाट कशी मोकळी करू,कळतच नाही आहे…

उज्वल भविष्याच्या अपेक्षा घेऊन वाटचाल करीत असताना ,आता या वळणावर मी कोणता नवीन मार्ग शोधू,कळतच नाही आहे…

एक एक पैसा जमा करून, पोटाला चिमटा काढून स्पर्धा परीक्षेची पुस्तके जमा केलेत ,आता ते सर्व पुस्तक पेटीत बंद करून कशी ठेवू , कळतच नाही आहे…

अशा या लॉक डाऊन च्या काळात माझ्या वेदना कशा व्यक्त करू ,मला कळतच नाही आहे…

मीना रामटेके ,चंद्रपूर

6 thoughts on “विद्यार्थी मनाची वेदना…

  • May 22, 2020 at 8:43 am
   Permalink

   आपल्या सर्जनशील विचारातून अवर्णनीय लिखाण ब्लॉग च्या माध्यमाने आपल्या सुरेख शब्दरचनेने कोरोनामुळं संबंध विद्याथ्यावर आलेलं संकट. त्याची दुःखद व्यथा , अप्रतिमतरित्या वर्णन करत ,खरी वसविकता दाखविली Today’s beautiful article

   Reply
   • May 22, 2020 at 12:44 pm
    Permalink

    धन्यवाद सर ,तुमच्या इतक्या छान प्रतिक्रियांमुळे माझ्या लिखाणातील उत्साह आणखी वाढवला जात आहे Thanks

    Reply
 • May 22, 2020 at 8:42 am
  Permalink

  आपल्या सर्जनशील विचारातून अवर्णनीय लिखाण ब्लॉग च्या माध्यमाने आपल्या सुरेख शब्दरचनेने कोरोनामुळं संबंध विद्याथ्यावर आलेलं संकट. त्याची दुःखद व्यथा , अप्रतिमतरित्या वर्णन करत ,खरी वसविकता दाखविली Today’s beautiful article.

  Reply
 • May 24, 2020 at 6:03 pm
  Permalink

  खूप चांगल्या पद्धतींन विद्यार्थ्यांनांची जी मनो वेदना आहेे ती पोहोचली आमच्या परियन्त

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami