रात्रीची चहल पहल..


जीवाची मुंबई झाल्यानंतर आज राात्री 8 वा.परतीची रेल्वे होती.त्यामुळे वेळेआधीच पोहचण्यासाठी आम्ही 2 तास आधीच दादर रेल्वे स्टेशनला यायला निघालो. 7 वाजले होते आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहताच ,अटेंशन प्लीज …… विदर्भ एक्सप्रेस अपने निर्धारित समयपर चल रही है… ही गोड आवाजातील सुचना कानावर पडताच हायसे वाटले.आपली रेल्वे ठरल्या वेळेत धावत आहे.याचे समाधान वाटले. प्लॅटफॉर्म क्र .2 वर पोहचवून सामानाची आवराआवर केली.आपली ट्रेन कुठून येणार याचा अधून-मधून ठावठिकाणा घेत होती.तेवढ्यात एक एक्प्रेस, मी उभी असलेल्या फलाटाकडे येताना दिसली.मला वाटले की, ही आपलीची गाडी असावी.. म्हणून हातात बैगा उचलल्या.परंतू ती एक्स्रपोस जवळूनच स्पीडने पुढे चालत गेली.😏तेव्हा कळले की ही आपली गाडी नव्हती.पुन्हा बैगा खाली ठेवल्या.
दहा मिनिटाच्या अंतराने स्टेशनवर पुन्हा अलाउन्स झाले …अटेन्शन प्लीज …विदर्भ एक्सप्रेस प्लॅटफॉर्मपर पहुच रही है. ही सुचना ऐकून खात्री पटली ही आपलीच गाडी ,लगेच बैगा उचलल्या आणि गाडी प्लॅटफॉर्मवर थांबताच, आरक्षित बोगीमध्ये जाऊन बसले.दहा मिनिटातच गाडी पुढील प्रवासाला निघाली.मागील चार –पाच दिवस या मुंबईने चांगलेच थकविले होते.लोकल ने चांगलेच चेपले होते.आणि आता या गर्दीतून सुटका झाली,याचे समाधान वाटले.

रात्रीचे 9 ते 10 वाजेपर्यंत गाडीमध्ये उतरणारे व चढणा-या प्रवाशांची लगबग सुच हो .
रात्री 11 ते 12 वाजता स्टेशनवरील गर्दी विसावली होती..माझ्या गाडीतील प्रवाशानेही आपआपल्या बर्थची जागा केव्हाच घेतली होती. मीही माझ्या बर्थवर विसावली होती.रेल्वे धावत असतांना अधून-मधून लहान-सहान स्टेशन अन् थांबे आले की,लाईटच्या प्रकाशावरून कळायचे . मध्य रात्री 2 ते 2:30 च्या सुमारास भुसावळ रेल्वेस्टेशन वर आमची गाडी थांबली,हायवे जक्शन होते.त्यामुळे गाडी थांबली होती. मी उठून खिडकीतून डोकाऊन पाहिले.अन एका प्रवाशाला विचारले ,कोणते स्टेशन? तो म्हणाला मॅडम ..भुसावळ.
मध्यरात्र असूनही प्रवाशाची गर्दी कायम होती. कुणी आपल्या नातेवाईकांना घ्यायला तर कुणी सोडायला येत होते.पाच मिनिटाची वेळ होऊन ही गाडी पुढे सरकली नाही.त्यामुळे नेमके काय झाले.याबाबत विचारणा केली.
समोरून येणारी एक्सप्रेस पास होईपर्यंत ही गाडी थांबणार असल्याचे कळले..
रेल्वेस्टेशन वरील कोलाहलीमुळे माझी झोप उडाली होती.त्यामुळे मी उठून बसली. माझ्य सोबत च्या मैत्री-नी डब्ब्याखाली उतरलया म्हणून मी ही त्यांच्यासोबत दरवाज्याजवळ उतरली होती.

रात्रीचे..3 वाजले होते.परंतू रेल्वे स्टेशन परिसर जागाच होता.दिवसा सारखीच धावपळ सुरू होती.चायवाला अधून-मधून हातात चहाची कैटली घेऊन.. लो..चाय..लो..चाय चाय मनत फलाटावर ये-जा-करीत होता.मध्येच कुणी त्याला आवाज दिला की,थांबून चाय द्यायचा.थोड्याच वेळाने कॉफी..कॉपी म्हणत कॉफीवाला ही त्याच्या मागून आला. तर कुणी मध्यरात्री आणि पहाटेच्या गर्भातच ..इडली..इडली म्हणत हाकर्सवाला आपली गाडी घेऊन होते.रेल्वेस्टेशन वरील ही लगबग पाहून पूर्ण दिवसच निघाल्या सारखे वाटत होते . माझ्या मैत्रिणी साठी हे सर्व वातावरण नवीन होते. कारण तिची ही पहिलीच मुंबईवारी होती.

स्टेशन जवळच्या उड्डाणपुलाजवळच्या होल्डींगवर काहीतरी काम सुरू होते. दोघेजण वर चढून होते.मी कुतूहलाने बघितले.कामगार त्या होल्डींवर नवे बैनर लावीत होते.त्यासाठी भले मोठे बैनर ते त्यासाठी चढवित होते..त्याच पुलाच्या भिंतीवर दोन मुले पोस्टर चिपकावण्याचे काम करतांना दिसले. लाईटाखालीच ते काम करीत असल्याने ते बैनर ‘बाजी’या चित्रपटाचे असल्याचे दिसले. उद्या चित्रपट गृहात बाजी चित्रपट लागत असल्याने त्याच्या जाहिरातीचे ते बैनर चिपकावण्याचे काम करीत होती. अधून मधून स्टेशनच्या बाजुच्या रोडने दुध,भाजीपाला,पेपरची वाहतुक करणारे कामगार रेल्वे स्टेशनवरील कैन्टीनंवर चाय घेण्यासाठी थांबत असे. शहरवासिय जरी अंधा-या रात्रीला घरात झोपले होते.पण रात्रीचा दिवस करणारे मात्र तेवढयाच स्फुतीने काम करीत होते. त्याचे हे आता रोजचेच झाले होते. मध्यरात्रीच्या लगबगीचा पहिल्यांदाच अनुभव आला होता.ऐरवी रात्रीच्या गर्भात मी ही सामसुम व्हायची .पण आज रेल्वे प्रवासात रातकिड्याप्रमाणे मग्न होते. दिवसा पुन्हा याच मार्गावर वर्दळ आणि गर्दीची लगबग सुरू असते.त्यामुळे ही जोखीम कामे शहर झोपल्यावर करीत असावी असे वाटते.एकी कडे रेल्वे स्टेशन परिसर वगळता शहर झोपलेले होते.तर रेल्वे परिसराचा भाग मात्र सुयोदयाप्रमाणे स्फूतीने काम करीत जागा होता.

लगेच थोड्या वेळात गाडीचा हॉर्न वाजला. आम्ही सर्व गाडीत बसलो व पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला.खिडकीतून बाहेर बघितले असता तेजाब चित्रपटातील गाण्याच्या ओळी आठवल्या …

सो गया ये जहाँ.. सो गया आसमान. सो गयी है सारी मंजिले..यो सारी मंजिले.. सो गया है रस्ता….

धन्यवाद

5 thoughts on “रात्रीची चहल पहल..

 • May 28, 2020 at 1:03 am
  Permalink

  मला वाचताना मी तीथेच कूठेतरी उभा राहुन हे बघतोय अस चित्र समोर आल. मुंबई वरूण येंतानाच्या सर्व आठवनि पुन्हा जीवंत झाल्या, खूप छान

  Reply
 • May 28, 2020 at 2:26 pm
  Permalink

  वाचतांना असे वाटले की हा अनुभव माझाच आहे

  Reply
 • May 28, 2020 at 3:05 pm
  Permalink

  खूप खूप सुंदर ताई आजचा हा तुझा लेख वाचून खरच खूप छान वाटला .

  Reply
 • May 28, 2020 at 4:03 pm
  Permalink

  छान लिहिले आहेस.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami