सुखाची परीसंकल्पना तरी काय…

सुख हे क्षणभंगुर आहे .कारण सुखाची अनुभूती दीर्घकाळ टिकणारी नाही. सुख हे व्यक्तीसापेक्षा नुसार बदलते .उद्भवलेल्या परिस्थितीत घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वभाव यावर सुखाची परिभाषा अवलंबून असते.
एखाद्या कृतीतून मिळणारा आनंद हा त्याच्यासाठी सुखाचा क्षण असतो .असाच बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रियेचा खुल्या चर्चेतून सूर उमटला.
तुमचे मनोगत..तुमच्याच शब्दात …पुढील प्रमाणे…

🌟 मंजुषा वैद्य रा. कल्याण, मुंबई

आजच्या विज्ञानाच्या युगात जगण्यासाठी आपल्याला भौतिक साधने व चैनीच्या वस्तूंची पण तेवढीच गरज आहे. पण या सगळ्या वस्तू म्हणजे सुख हे बोलणे ही योग्य नाही. किंवा झोपडपट्टीत राहणारा व्यक्ती हा दुःखी आहे .हे ही म्हणू शकत नाही. आपलं सुख कशात हे ठरवणे आपल्या मनावर अवलंबून आहे. काही व्यक्ती थोडक्यात समाधानी आहेत. तर काही जवळ भरपूर काही असूनही मनाला समाधान नाही. काही समाधानी असलेच तर त्यांच्याकडे आरोग्य नाही. म्हणून प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे.
माझ्या मते तर माणसाला मेहनत कितीही करावी लागली तरी चालेल, पण आरोग्यदायी जीवन व प्रेमळ माणसांचा सहवास मिळावा यातच माझे सुख असेल.

*************************************************

🌟 पंकज आसेकर, सिंदेवाही जि. चंद्रपूर

प्रत्येकाला सुख हवं असत, पण नेमकं सुख म्हणजे काय?याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र ही बाब वयक्तिक ठरते. कारण आयुष्याच्या जडणघडनित आपल्याला जे जे काही आनंद देत, ते सुख होत जातं, कधी मग ते वस्तू द्वारे किंवा त्याच्या वापरातून असो किंवा मग जिवंत माणसाकडून मिळालेलं असो, इंग्लिश मध्ये याला छान शब्द आहे pleasure!! आपल्या जगण्याचा दृष्टिकोन जसा असेल असंच सुखाची परिभाषा ही बदलत जाते हेच खरं, सुख हे अल्पकालीन असतं याची जाणीव कायम ठेवावी, आणि सुखापेक्षा समाधानी आयुष्य हेच घ्येय असावं, सुख काय ते मिळत आणि क्षणभंगूर असल्याासारखं काळाच्या ओघात नकळत क्षीण होत जातं.

*************************************************

🌟 सुकेशिनि मून अलिबाग, जि.रायगड

Happiness is a feeling of pleasure and positivity. It is a state of mind which reflects the positive and joyful mental condition of a person. It is a situation based tendency, comes in a positive and joyful environment.

We must avoid running after materialistic things such as money, as it is a mean to gain comfort but not happiness. A person who is poor and has less money is happier in comparison to the person who is richer but is unhappy and frustrated.

Happiness comes from inner and mental satisfaction. A person is happy when he/she stays with family members , shares all things, and every time he/she is supported by family members in good and bad time.

Train your mind to see the good in everything. The happiness of the life depends on the quality of our thoughts.

*************************************************

🌟 योगेश निरंजने, चंद्रपूर

सुखाची परिभाषा व्यक्ती अन्वय भिन्नचं. माझ्या मते,सुख हि मनाची परिकल्पना, मनाच्या अवस्थेचा एक हिस्साचं. भौतिक सुख हे तेव्हाचं आनंद देतो, जेव्हा मन त्यात असतं. एखाद्या गोष्टीतून सतत मिळालेल्या सुखाचा अतिरेक हा त्यातला आनंद हिरावून घेतो. त्यावेळी गोष्ट तीच असते, पण चाखलेल्या सुखाच्या चवीने मन मात्र संतुष्ट असतं. माझ्या मताप्रमाणे, आनंद हा मनात उत्पन्न झालेल्या विचारातून प्राप्त होत असतो. पैशाचं खरं सुख हे त्याला विचारावं, ज्याच्या खिशात नेहमीचं दारिद्र्य वावरत असतं. पोटाचं खरं सुख हे त्याला विचारावं, जो एका वेळच्या अन्नालाही मौताज असतो. कुटूंबाच खरं सुख हे त्याला विचारावं, ज्याच्या अंतिम श्वासाला सोबतीचा एकही साथ नसतो. गडद आयुष्यात छेद करत प्रकाशाचा एक किरण,जेव्हा डोकावू लागतो तेव्हा खरा सुखाचा अनुभव प्राप्त होतो. शेवटी प्रत्येक क्षणाला सुखाच्या शोधात धावत सुटणारा मनुष्य एका विशिष्ट बाह्य चक्रवृहत सापडतो,पण खरं सुख हे त्याच्या अंतर्मनात दडलेलं असतं….

*************************************************

🌟 ओजस्वी सातपुते, चंद्रपूर

जनी सर्व सुखी असे कोन आहे, विचारे मना तुची शोधूनी पाहे, या पंक्ति प्रमाणे सर्वात सुखी मनुष्य शोधुन सुद्धा सापडनार नाही। कारण सुख हे आपल्या मानन्या वर अवलंबून असत। एखाद्या गोष्टीनी आपल समाधान जाले तर तातपुरते का होइना आपन सुखी होतो। पन तेवढ्या क्षनापुरतेच कारण माणसाच्या अपेक्षा ह्या वाढत असतात। मनुष्य कायम आपल सुख कशात आहे है शोधत फिरत असतो। असमाधानी व्यक्ति कधीच समाधानी होवू शकत नाही। माज्यामते आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीमधे जर आपण समाधान मानल तर सुखासाठी आपल्याला इतरत्र कुठेहि शोधन्याची गरज पडणार नाही। ” खरे सुख मनाच्या आत्मिक समाधानात असत।

*************************************************

🌟 विक्की दीलीप दुपारे रा. नालासोपारा, मुंबई

‘ सुख’

मित्रांनो आयुष्यात सर्वांना ह्या क्षणांची एक वेगळीच ओढ आसते.
आणि सुख हा ऐक असा अनुभूती आहे जो प्रतेक माणसाला त्याचा आयुष्यात उपभोगायचा असतो मग ते सुख कशाचे ही असू शकते आणि ते त्या उपभोगनाऱ्या वर अवलंबून आहे .आणि माझ्या मते सुखाची प्रत्येकाला सुखाला ऐक स्वतःची व्याख्या असावी.कारन प्रतेक माणसांची त्याचा समाधाना वर सुख हे अवलंबून असत आणि जो माणुस समाधानी असतो त्यला नक्कीच सुख हे चांगल्या रित्या उपभोगता येते .
कधी कधी महालात राहणारा सुधा सर्व कही असूनही त्यला त्याला सुख अनुभवता येत नाही कारण त्याला अजून समाधान झाले नाही.
तर तिकडे झोपडीत राहणार मजूर त्याला व त्याचा कुटुंबाला ऐक वेळेच पोटभर जेवन जेऊन सुधा तो त्याला त्याच सुख मानतो.
आजची तरून पिढी जे ह्या आपल्या देशाचे भविष्य उभे करतील मात्र त्याना आजकल मोबाईल व्यसनाने जक्डुण ठेवलय.त्याच सुख व समाधान हे लोकांच्या liks , coomments आणि followars मधे शोधतात😞
सुखाला उपभोगायच असेल तर माणसाने आधी समाधानी असावे.तर तो त्या सुखाचा आस्वाद घेऊ शकतो .आणि जो माणुस दुसऱ्याच्या आनंदात आपले समाधान मानतो तो माणुस नक्कीच सुखी असतो.

*************************************************

🌟 सुषमा चंदनखेडे, चंद्रपुर

सुख म्हणजे नेमकं काय ? सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असेलही पण सुख म्हनताच सर्वप्रथम माझ्या मनात येत ते आनंद प्रसन्नता आणि अनुकूल परिस्थिती या सर्वांची सांगड म्हणजे सुख. सुख हे भौतिक साधन आणि आंतरिक समाधान या दोन्ही बाबीवर अवलंबून आहे .कुणी सुख फक्त भौतिक साधन आणि चैनीच्या वस्तू मध्ये शोधू शकते तर कुणी आपल्या अंतर्मनातील समाधानात शोधू शकत .मला वाटत कुटुंबातील प्रत्येकाला एकमेकांप्रती असलेलं प्रेम आपुलकी आणि अनुकूल आर्थिक परिस्थिती म्हणजे सुख .आपण करीत असलेलं प्रत्येक काम ज्यात आपण अंतर्मनातून समाधानी होतो ते सुख.

*************************************************

🌟 सिल्वेनिया रायपुरे, चंद्रपूर

Hello 😊
सूख हा लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी खूप छान वाटतो परंतु वास्तविक पाहतातेवढ्यातच कठिण वाटतो. लहान पणा पासून आईवडिलांनी देवबाप्पा जवळप प्रार्थना करायची शिकविली ति याप्रमाणे ‘देवबाप्पा मला सूख दे!’ पण सूख म्हणजे नक्की काय? हाच प्रश्ण पडला 😔 काय तूम्हाला माहिती आहे सूख म्हणजे नक्की काय? चला मग तूम्हाला मी एक गोष्ट सांगते एका शहरात दोन घरी मुले जन्माला येतात एक श्रिमंताकडे आणि एक गरिबाकडे दोन्ही मुले आपापल्या घरी लहानाची मोठी होतात. श्रिमंत घरच्या मुलाकडे खूप छानछान कपडे, खेळणी,चेंडू , सायकल, गिटार, विडियो गेम आणि हो त्याच्या घराच्या बागेत स्विमिंग पूल पण असतो . परंतु तो घरात एकटाच खेळत असे कारण त्याचे आईवडील नोकरी करणारे असल्यामुळे त्यांच्या कडे वेळच नव्हता शिवाय आईवडिलांच्या म्हणण्यानुसार श्रिमंत घरची मुले फक्त घरातच खेळतात. तो खूप उदास आणि दुखी होवून आपल्या घराच्या खिडकीतून डोकावून त्या गरिब मुलाकडे बघत असतो. तो मुलगा आपल्या घरासमोर असणार्या बागेत लपनछूपन, गिलीडाडू , क्रिकेट, चेंडू, सायकल रेसिंग इ.. खेळ-खेळत असे आणि जवळ असणाऱ्या तळ्यात पोहाचे शिकत असतो हे सगळे दृश्य पाहून तो मुलगा किती ‘सूखी’ आहे हे शब्द श्रिमंत घरचा मुलगा म्हणतो इकडे गरिबीत असलेला मुलगा मळकट आणि फाटलेले कपडे घालून तसेच फुटलेला चेंडू , किरायाची सायकल चालवून खूप उदास आणि दुखी होवून म्हणतो की तो श्रीमंताचा मुलगा किती ‘ सुखी ‘ आहे.
तर मग ,आता कोण सुखी आहे ?

 • भौतिक साधने असणारा मुलगा
 • कि भौतिक साधने नसणारा मुलगा ….✒

*************************************************

🌟 सौ.अर्चना लिंगे, बल्लारपूर

सुख ..सुख..म्हणजे नेमकं काय ?हा प्रश्न मला आताच भेडसावत नाही तर पूर्वी सुद्धा मला वाटायचे की नेमकं सुख म्हणजे काय नोकरी करणारे जोडपे पाहून व त्यांच्या चैनीच्या वस्तू, घरी काम करणारे नोकरचाकर पाहून असे वाटायचे काय सुखी आहे कुटुंब .पण जेव्हा त्यांचे जीवन जवळून बघितले तर त्यांच्यात जास्तीत जास्त वादच दिसायचा वादच व्हायचा. मग प्रश्न पडायचा हे कशाचे सुखी आहे त्यापेक्षा झोपडपट्टीत गरीब जीवन जगणारे सुखी आहेत झोपडपट्टीतील लोक दिवसभर काम करतात व सुखाचे रात्री दोन घास खाऊन झोपी जातात .पण त्यांचेसुद्धा जीवन जवळून अनुभवले तर त्यांच्यात दारू पिऊन सतत भांडण किंवा एखाद्या संशयावरून बायकोला मारहाण मुलांना मारहाण करणे. असे दिसायचे हे काय जीवन आहे ? यात काय सुख आहे पण सतत विचार करून शेवटी प्रश्न राहायचा तो म्हणजे सुख म्हणजे काय?
बालपणी मोठ्यांना नमस्कार केल्यानंतर “सुखी व्हा “असा आशीर्वाद देताना आपण पाहतो किंवा अनुभवतो याचा नेमका अर्थ काय तर कशाची आसक्ती न बाळगता आनंद घेणे हा दृष्टिकोन होय. मनुष्यप्राण्याचे सगळे आयुष्य सुख सुविधा मिळवण्यात किंवा त्यांचा उपभोग घेण्यातच व्यथित होते. मूलभूत गरजांची प्राप्ती झाल्यानंतरही एशो आरामाचे जीवन काढल्यानंतरही तुम्ही सुखी आहात काय ?असा प्रश्न विचारा कोणासही हा प्रश्न विचारल्यानंतर त्याचे विधान मनस्थिती होते .हा , हो असे हसून उत्तर देतील जर तुम्ही त्यांना विचारले की दुःखी कष्टी होण्याचे कारण काय तर कोणाचे मनस्वी ला असणार नाही किंवा असून अर्धसत्य ही कोणी सांगणार नाही मग लोक दुःखीकष्टी का आहे
आयुष्यात सर्व सुखाची सर्व साधने उपभोगू नही लोक सुखी होऊ शकत नाही कारण स्पष्ट आहे भौतिक सुविधा पासून मिळालेले इंद्रिय सुख कोणत्याही व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही जर भौतिक वस्तू संपत्ती पासून सुख मिळवता आले असते तर अमेरिकेतील लोकांमध्ये आनंदाचा परमोच्च बिंदू सर्वाधिक दिसला असता
एकीकडे आपण बहुतेक गर्जना करून सुखी राहू शकत नाही तर दुसरीकडे भौतिक आयुष्यात आपणास इंद्रिय सुख मिळते. परंतु त्याचा आनंद मिळत नाही. आपण केंद्रीय सुखातच आनंद शोधतो परंतु इच्छा संतुष्टी व आनंद आतील अंतराचा फरक आम्हाला कळत नाही कारण एक इच्छा पूर्ण झाली म्हणजे सर्व इच्छा संपली असे नाही. जोपर्यंत इच्छा शिल्लक आहे तोपर्यंत त्या पूर्ण करण्यासाठी बेचने या अशा शत्रुत्व भावनेचा जन्म होत असतो.
शेवटी माझ्यामते असंच म्हणावे लागेल की सुख म्हणजे आहे त्यात समाधान मानावं ‘ पदरी पडले पवित्र झाले ‘या उक्तीप्रमाणे जे मिळाले त्यात समाधान मानावे परिस्थितीशी जुळवून घ्यावे ज्यामुळे मनाला कधी खंत होणार नाही मन आनंदी राहील हे तर झाले मनाचे परंतु जर तुमचे शरीर सुदृढ, निरोगी राहणार तर तुमच्या सारखे सुखी तुम्हीच…!

*************************************************

🌟 मोनाली चंदनखेडे, नागपूर

सुख म्हणजे नेमके काय? प्रत्येकाच्या मते सुखाची कल्पना ही वेगवेगळी असते. सुख हे पैश्यांनी विकत घेता येत नाही तर ते अनुभवावे लागते, सुख म्हणजे मनाला मिळणारा आनंद व समाधान होय आणि ते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतूनही अनुभवता येते अर्थातच ते आपल्या मानण्यावर असते. सुख म्हणजे एकात्मतेचे दर्शन, सुख म्हणजे कुटुंबातील सदस्यांचा आनंद, सुख म्हणजे प्रत्येक अनुभवातुन मिळालेले समाधान.
आणि सुख म्हणजे आपल्या आयुष्यातील गोड आठवणी.

*************************************************

🌟 श्वेता पिपरे, चंद्रपूर

सुख म्हणजे नक्की काय असते?
सुख हे आपल्या सभोवताली असते ते फक्त आपल्याला शोधायचे असते.
सुख म्हणजे काय हे लहान मुलाकडून शिकायचे असते तुटलेल्या गाडीमध्ये देखील तो आपले सुख शोधत असतो.
कोणताही स्वार्थ न ठेवता ऐखाद्याची मदत करण्यात एक वेगळा आनंद असतो.

*************************************************

🌟 स्नेहा रामटेके रा. पोंभुर्णा चंद्रपूर

सुख म्हणजे काय असते हे मला आता पण कळलेल नाही आहे. सुखाचा अनुभव प्रत्येकालच येत असतो तो कसा घायचा तो जानी त्यानी ठरवायचा असतो. माझ्या तरी मते सुखी होण्यासाठ समाधानी व्हायला पाहीजे. पण माणुस कधीच समाधानी नाहीच. काही वेडा जॉब,पैसा, बालेन्स असून सुद्धा ते शेअर करायला जवळ आपले माणसं नसतात,मग काय अर्थ सुख असून सुधा समाधानी नाही.म्हणून मला तरी वाटते सुख म्हणजे समाधान.

*************************************************

🌟 प्रिया जनबंधू , चंद्रपूर

Majya mate sukh kontya vastu ni athva sadhna ni prapt nahi hou shakat. Jo manani samadhani aani jyala vartamanatala pratek kshan jagta yeto to vyakti sukhi.

*************************************************

🌟 सौ.रंजना ढोलणे, चंद्रपूर

सर्वांना वाटते माझे जीवन सुखी-समाधानी जावो, धनसंपत्ती सुख शांती राहो, मनुष्या ने नेहमी सदाचारी जीवनाचे पालन करावे .
आई-वडिलांचा आदर सन्मान करून बहिण भाऊ नातेवाईक यांच्याशी संबंध टिकवून ठेवणे मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेणे त्यांची सेवा करणे याच्यात मला सुख वाटते.
तसेच आपल्या नवऱ्याची सेवा करणे ,मुलं सांभाळणे, घर सांभाळणे, एक गृहिणी म्हणून घरातील पूर्ण काम करणे सर्वांच्या आवडीनिवडी जपणे. या सर्व गोष्टींमध्ये पण मला सुख वाटते व मी यातच खूप सुखी व समाधानी स्वतःला समजते.

*************************************************

🌟 अर्चना रायपुरे, चंद्रपूर

आपल्याकडे चैनीच्या सर्व वस्तू आहे पण मना मध्ये आपण समाधनी नसेल तर त्या चेनीच्या वस्तू कोणत्या कामाचे मनू न माझा मत अस की भवतिक साधने आणि चेणीच्या वस्तू याला आपण परिपुर्ण सुख मानता येणार नाही समजा माणूस झोपडपट्टीत राहत असेल आणि मनानी खूप समजूतदार असेल तो मदत करण्यास नेहमी तत्पर असेल त्याच्यावणी सुखी समाधानी कुणीच नसेल माझ्या मते सुखी म्हणजे तो व्यक्ती लहान लहान गोष्टी मध्ये आनंद शोधत असेल तर तो व्यक्ती खर सुखी

*************************************************

जीवनाचा अविभाज्य अंग असणारा ,आपापल्या परीने सुखा विषयी संकल्पनावर मित्र-मैत्रिणींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला .
त्यातील निवडक आणि वाचनीय प्रतिक्रियांचा समावेश केलेला आहे. मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल व ब्लॉग ला दाखवलेल्या आपुलकी बद्दल शतशः आभारी आहोत.
असाच वाचनाचा, लिहिण्याचा छंद यापुढेही वृद्धिंगत करूया…

धन्यवाद

मीना रामटेके , चंद्रपुर

5 thoughts on “सुखाची परीसंकल्पना तरी काय…

 • May 31, 2020 at 7:31 am
  Permalink

  सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यास लक्षात येत की, सुख आपल्या मानण्यात किंवा न मानण्यात आहे, यात गरजपूर्ती ही फार महत्वाची आहे, मग ती गरज भौतिक असो की मानसिक, कामना पूर्ती झाली की सुख अनुभवाला येत. म्हणून अल्पसंतुष्ट असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे,आयुष्यातील लहान सहान गोष्टींचा आनंद घेऊन फक्त पुढे चालत राहायचं…😊😊

  Reply
 • May 31, 2020 at 7:38 am
  Permalink

  ताई, आठवडयातुन एक दिवस तुम्ही खुली चचा घेता. त्याच्यामूळ मला त्या विषयावर माझे मत माडता येते आणि दुसऱ्याचे पण काय मत आहे हे पण पाहायला मिळते. असंच तुम्ही खुली चचा घेत जा. आणि नविन नविन विषय घेत जा.

  Reply
 • May 31, 2020 at 8:32 am
  Permalink

  सर्वांच्या प्रतिक्रिया खुप छान आहे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami