मला कधी जमलेच नाही…

या बनावटी दुनियेत, मुखवटा धारण करून राहणे.मला कधी जमलेच नाही.

एखाद्या छोट्या गोष्टीचा उहापोह करणे, म्हणजेच राईचा पहाड बनविणे. मला कधी जमलेच नाही.

दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे असे वागणे,मला कधी जमलेच नाही.

मनाच्या कोपऱ्यात ईर्षेची भावना ठेवून ,दुसऱ्याची खोटी स्तुती करणे,मला कधी जमलेच नाही .

दुसऱ्या मधील अवगुन सांगून, स्वतःचा मोठेपणा मिरवणे, मला कधी जमलेच नाही.

आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना पाहून संवेदना बधिर करून जगणे ,मला कधी जमलेच नाही.

गरिबांकडे कानाडोळा करून केवळ श्रीमंतांचे गुणगान गाणे ,मला कधी जमलेच नाही.

समाजातील वेदना , व्यथा टाळून असंवेदन मनाने विहार करणे .मला कधी जमलेच नाही.

मित्र-मैत्रिणी ,नातेवाईक हा गोतावळा तोडून एकटे राहणे. मला कधी जमलेच नाही.

या झगमगत्या दुनियेत मनाची सुंदरता न बघता, केवळ त्यांचा रंग ,रूप,वर्ण,बघूनच त्यांच्याशी जवळीक साधणे, मला कधी जमलेच नाही.

या स्पर्धेच्या युगात प्रामाणिक पणे अभ्यास करताना, नोकरी मिळवण्याकरिता कोणाला घास पूस देणे. मला कधी जमलेच नाही .

तुम्हा सर्व वाचकांशी निशब्द होऊन, एकटेच आपल्या विचारात रमणे, मला कधी जमलेच नाही.

मीना रामटेके, चंद्रपूर

3 thoughts on “मला कधी जमलेच नाही…

 • June 1, 2020 at 7:04 am
  Permalink

  👏👏👍👍nice👌👌

  Reply
 • June 1, 2020 at 4:11 pm
  Permalink

  असंच सर्वांनी विचार करून वागल्यास चित्र वेगळे असणार…. खरं तर मॅडम तुमची ही पोस्ट शाळेतील पुस्तकात समाविष्ट व्हायला पाहिजे…….

  खूप छान विचार मॅडम ….. 💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami