मानाची… पंगत

गावात होणा-या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पगंतीमध्ये जेवनाचा आनंद न्याराच. त्या क्रार्यक्रमापेक्षा पगंतीकडेच अधिक लक्ष राहायचे.

लग्नसोहळ्यात तर नवरदेव आल्यापासून ते लग्न लागेपर्यंत पगंतीचेच आकर्षण राहायचे.लग्नाची विधी शेवटच्या टप्प्यात आल्यावर मात्र काही जण मधेच उठून पगंत कुठे बसणार याचा आढावा घेत.महिलांची पहिली पगंत पुरुषांच्या पहिल्या पंगती बरोबरच बसणार आहे काय,याचीही चाचपणी काही महिला घेत. असे झाल्यास हा निरोप सोबत असलेल्या मैत्रिणी आणि कुटूंबातील महिलांना द्यायच्या. नाहीतर पुरूषाची पहिली पंगत उठेपर्यंत प्रतिक्षा करायच्या. मात्र तोपर्यंत कपाळावरील घाम पुसता पुसता रूमालही आेला होऊन जायचा.

आम्ही लहान असताना महिलेच्या पहिल्याच पगंतीत जागा पकडण्याची आमची जबाबदार होती.यासाठी आम्ही मैत्रिणी दोन-दोन च्या अंतराने जागा पकडण्यासाठी सज्ज राहायचो. जशी पगंत बसायची तसेच आम्ही पगंतीच्या मधोमध जागा पकडत होतो. याला कारणही तसेच होते,वाढणारे सर्वजण आवर्जून मधल्या रांगेपर्यंत येत असे. नाहीतर शेवटपर्यंत वाढत आला की ,बकेटमधील पदार्थ संपत असे.असे प्रसंग आमच्या सोबत अनेक वेळा घडले,त्यामुळे आम्ही आमची रणनिती बदलविली होती. आता कुठलाही पदार्थ न मिळण्याचा धोका आम्ही पत्कारत नव्हतो. किंवा शेवटी बसले की,वाढणारे शेवटपर्यंत पोहचणार नाही. त्यामुळे शक्यतो मध्यभागी बसले की,वाढपे कुठूनही येवोत.आपल्यापर्यंत पोहचणारच.अशी खात्री राहायची.

पगंत बसल्यावर पत्रावळ फाटकी तर नाही ना? याची खात्री करून घेत असे. समजा आली असेल तर लगेच ती बदलून घेत असे. द्रोणही व्यवस्थीत आहे ना हे ही पाहून घेत असे. मग एकामागून एक वाढप्पे येत. त्याच्याकडील सर्वच पदार्थ पत्रावळीत घेत होतो. एखादा पदार्थ सुटला नाही ना,हे आजू-बाजूलाच नव्हे तर पाठीमागील पगंतीत नजर टाकून पाहून घ्यायचो. एवढ्यात बाजुच्या पत्रावळीत मीठ दिसले.परंतू आपल्या पत्रावळीत मीठ जरी नसले तरी, मीठवाल्याला आवाज देऊन मीठ टाका येथे असे हक्काने म्हणायचो. इतपत बारकावे पंगतीत राहात होते. एकदाची पत्रावळ पुर्ण झाली की, कधी श्लोक पूूर्ण होते,याची प्रतिक्षा राहायची .तेवढ्यात पहाडी आवाजाचा माणून पगंतीच्या मध्ये उभा राहून श्लोक म्हणायचा. आणि श्लोक पुर्ण झाल्यानंतर पत्रावळीतील भाजी-पोळी किंवा पत्रावळ संपेपर्यंत वर पाहत नव्हतो.मधामधात सावकाश जेवा,पोटभर जेवा,अशा सुचना जेष्ठ मंडळी देत.परंतू त्याकडे आम्ही जराही लक्ष देत नव्हतो.पत्रावळ आणि आम्ही,याशिवाय दुसरीकडे लक्ष राहत नसायचे.

अधून-मधून पत्रावळीतून एखादा पदार्थ संपायला आला की, तो पदार्थ वाढणा-याला लगेच आवाज देऊन इथे वाढा असे सांगायचो.तसेच तीन ते चार महिलांच्या अंतरावर आवडीचा पदार्थ वाढणारा दिसला की,आपल्यापर्यंत येईपर्यंत पत्रावळीतील तो पदार्थ फस्त करून टाकायचो.आणि आपल्यापर्यंत पोहचला की,लगेच पुन्हा त्याला इथे टाका असे सांगत. पत्रावळीतील आलू-वाग्यांची भाजी मात्र पत्रावळीवर अधिराज्य गाजवायची.पोळी,भातातून या भाजीची तर्री वाट काढून पत्रावळीचे शेवटचे टोक गाठायची. अधून-मधून त्या भाजीतील तर्री पोळीने पुसून घेत .पत्रावळीत कीतीही पदार्थ असले तरी आलू-वाग्यांच्या भाजीशिवाय पत्रावळीला साज येत नव्हता.

पगंतीमध्ये बुंदी,आणि आडवे-उभे भज्याचे खास आकर्षण राहायचे.आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे द्रोणामधील कढी.द्रोणाचे दोन्ही कान धरून तोंडापर्यंत नेऊन गरमागरम कठी वर फुरका मारण्याचा वेगळाच आनंद.गरम कढीचा फुरका मारल्यानंतर एखादा पराक्रम गाजविल्यासारखे समाधान वाटून जायचे. कधी-कधीतर कढी पिण्याची शर्यतही लागत असे.पिणा-यांची शर्यत व्हायची.परंतू वाढणा-यांची मात्र वाट लागून जायची. लग्नातील सर्वच पदार्थावर ताव मारून पोटभर जेवल्याने पंगतीतून तृप्त होत असतांना पाठीमागे काही वेळाने महिला पहारेदार उभ्या राहायच्या. पगंतीतून उठल्यानंतर जागा काबीज करण्यासाठी या महिला जेवन पुर्ण होण्याआधीच उभ्या राहत असे. पोटभुगेपर्यंत जेवन झाल्यानंतर पगंतीतून उठायचो ते हात धुण्यासाठी. पोटभर जेवण झाल्यामुळे घरी जातांना आळस ही यायचा.

परंतू हाच खरा पगंतीमधील सन्मान हा सध्याच्या बफेला नाही. आपल्याकडे तर खरा शब्द “बुफे “या शब्दाला बफे करून टाकले आहे .बफेमधील ताटातील मेनू वाढले.परंतू सर्व पदार्थ ताटात घेतल्यानंतर ताटाचे वाढणारे वजन,आणि असे वजनी ताट (थाली) हातात घेऊन जेवन करूनही मन तृप्त होत नाही.असा सर्वांचाच अनुभव.बफैमध्ये नवनवीन दिसणारे पदार्थ पोटात झोकूनही घरी आल्यावर मात्र उपाशीच असल्यासारखे वाटते.पगंतीच्या जेवनाची तृप्तता आज बफेत दिसत नाही.

बदलत्या काळानुसार रूढी,परंपरा यांच्यातही काहीसा बदल घडून येत आहे.गावाकडील अनेक रूढी आता लोप पावत चालल्या आहे. लग्नसराई आणि पगंतीचा जवळचा संबध.विशेषता ग्रामिण भागात लग्नकार्यात पगंतावरी उठायच्या.वराकडील पाहुण्यांची खातीरदारी करण्यासाठी गावातील युवकांची फौज सज्ज राहत असे. लग्नकार्य आटोपल्यानंतरचे महत्वाची कामगिरी ती म्हणजे जेवणाची पगंत होय.पाहुण्यांच्या स्वागतापासून तर जेवणावरून कुठलाही वाद-विवाद होणार नाही.याची सर्वस्वी जबाबदारी या युवकांच्या फौजांकडे राहायची.

शेवटचा माणूस तुप्त होईपर्यंत जेवन वाढायचे.याची खास दक्षता घेतली जात. आज मात्र या बफे मुळे अन्नाची नास धूस ही खूप जास्त प्रमाणात होताना दिसून येते .असो,

कोणत्याही सार्वजनिक समारंभातील एका आेळीत तरड पट्टीवर जेवणासाठी बसणा-या पगंतीचे वैभव,समाधान व संस्कृती मात्र हरविलेली दिसते आहे. पगंतीचा गोडवा हरविला आहे.

तरीही लॉक डाऊन संपल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बफे मध्ये भेटूच.

धन्यवाद

10 thoughts on “मानाची… पंगत

 • June 2, 2020 at 12:20 am
  Permalink

  सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.

  Reply
 • June 2, 2020 at 7:35 am
  Permalink

  😀 नक्कीच भेटू ! तुझा आजचा लेख वाचून ऐक आठवला की पंगतीत पुढे बसणारे लोका आयुष्यात कधीच मागे पडत नाहीत
  very nice di 👌👌

  Reply
 • June 2, 2020 at 10:13 am
  Permalink

  Aamhi pan lahan pani hech karycho.
  Aajhi gavakade gelo ki pangti madhe madhlich jaga pakadto,shevti paryant wadhne wale yayla ved lagto na mhnun😉😆😁. Khup chan vatal lekh wachun. Kadhi ekda pangti madhe jevyla jate as watat ahe.😍🤩🤗

  Reply
 • June 2, 2020 at 10:55 am
  Permalink

  जून ते सोन या म्हनी प्रमाने पंगत आजच्या बाफेच्या तुलनेत काधिही श्रेष्ठ आहे आणि आज ती कला मात्र लोकांच्या जगन्याच्या पद्धति नुसार लोप पावत चालली आहे.
  खुप छान

  Reply
 • June 2, 2020 at 6:27 pm
  Permalink

  *पंगत*
  मस्त लिखाण…. *गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी*…

  खरंच खूप छान लिखाण मॅडम💐💐💐👍👍👍👍

  तुमची पोस्ट वाचताना मी पण बालपणातील आठवणीत जाऊन प्रत्यक्षात बघितले…… लिखाणात दम आहे मॅडम…..
  सुरुवातीपासून शेवट पर्यंत जे काही लिहिले ते सर्व आम्ही ही अनुभवले नव्हे प्रत्येकालाच हा अनुभव आला ही असेलच…. मनःपूर्वक धन्यवाद मॅडम … *तुमच्या लिखाणामुळे आम्हाला बालपणातील आठवणीत जगण्याची संधी मिळाली*💐💐💐💐💐💐 याच्या सुटलेल्या दुसऱ्या पार्ट ची वाट बघतोय💐💐💐💐💐

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami