पावसाळा आला… आरोग्य सांभाळा
जून महिन्याला सुरुवात झालेली आहे.त्यामुळे आता काही दिवसातच मान्सूनचे आगमन होऊन पावसाळ्याला सुरुवात होईल.सर्वत्र थंड वारे वाहू लागतील,दूरवर मातीचा सुगंध दरवळेल, इंद्रधनुष्याचे दर्शन घडेल, आजूबाजूचे वातावरण आल्हाद कारक होईल,अशा या मोहक वातावरणात आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे.
मग अधून मधून पावसात भिजणे,पावसाचे पाणी रस्त्यावर साचेल, डबके तयार होईल नाल्या विविध आजारांचे माहेरघर ठरतील. पावसाळ्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होण्याची दाट शक्यता असते. आधीच कोरोना चे संकट त्यात आणखी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी म्हणजेच पावसाळा येताना सोबत रोगराई आणि साथीचे आजारही घेऊन येतोच.अशा कठीण समय आपले आणि कुटुंबाचे आरोग्य सांभाळणे आवश्यक ठरते अशावेळी आहार कसा असावा, हे जाणून घेऊनच आपले आरोग्य सांभाळता येईल.
याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. स्वाती नागरकर यांच्याशी संवाद साधला.पावसाळ्यात नेमके काय खावे,काय खाऊ नये, याविषयी मार्गदर्शन आणि महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेतल्या, त्या आम्ही वाचकांशी शेअर करीत आहोत.
पावसाळ्यात प्रमुख्याने होणारे आजार–
सर्दी,खोकला ,ताप, हाडांचे दुखणे, डोकेदुखी,अंगदुखी, त्वचाविकार ई.आजारांची साथ दिसून येते याच काळात रुग्णांची संख्या वाढत असते यादृष्टीने इलाजाची वेळ येऊ नये. यासाठी आपले आरोग्य जपणे केव्हाही बरे कारण या ऋतु बदलाचा परिणाम शरीरावर होतोच .
आरोग्यासाठी आहाराच्या महत्वपूर्ण टिप्स–
*शक्यतो , रोज गरम व ताजे अन्न सेवन करावे.
*पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करावे.
*रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व क व ई असलेले फळ जास्तीत जास्त खावे.
*लसुन,जवस ,तीळ,राजगिरा लाडू इत्यादीचा आहारात समावेश करावा.
*जेवणात ज्वारी तसेच नाचणीची भाकर खावी.
*बेकरी फूड , फास्ट फूड ,जंक फूड आवर्जून टाळावे.
*तिखट,तेलकट चे आहारातील प्रमाण कमी करावे.
*पाणी उकडून प्यावे.
*शिळे अन्न खाऊ नये.
*शक्यतो मांसाहार ही टाळावे.
* संतुलित आहार असावा.
* वेळेवर जेवण करावे.
*रात्री जास्तच उशिरा जेवण करू नये .
*6 ते 8 तास इतकी पुरेशी झोप घ्यावी.
*तुमच्या सर्वांच्या निरोगी व सुदृढ आरोग्याकरिता सदिच्छा…
धन्यवाद
Ok.
Thanks