भीती…

आयुष्यात कोणतेही कार्य करत असताना प्रत्येकालाच असते थोडीफार भीती….

सध्याच्या वातावरणात जास्त वेळ घरातच बंद राहिल्याने मानसिक संतुलन बिघडण्याची भीती…

बाहेर जाऊन कुणाच्या संपर्कात आलो तर कोरोना संक्रमणाची भीती….

घर सागरी किनारपट्टीवर असणाऱ्यांना सुसाट चक्रीवादळाची भीती….

शेतकऱ्यांना संपूर्ण पीक नासाडी करणाऱ्या किड्यांची भीती…

आर्थिक संकट कोसळल्यामुळे आता सर्वांनाच भविष्याची भीती…

आता परदेशात जाण्याची ही वाटते भीती …

जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला कशाची ना कशाची असतेच भीती…

कशाची…ही भीती … जगण्याची की मरणाची ?

कधी जिवंत माणसांची भीती…

कधी संकटांची भीती …

कधी भविष्याची भीती …

कधी रक्ताच्या नात्यांच्या दुराव्याची भीती…

कधी असुरक्षिततेची भीती…

कधी एकटेपणाची भीती…

कधी अपयशाची भीती…

कधी समाजाची भीती…

कधी मरण्याची भीती…

संपूर्ण जीवन भीतीतच गेले आणि या भीतीमुळे जगणे राहूनच गेले.

मीना रामटेके, चंद्रपूर

3 thoughts on “भीती…

  • June 6, 2020 at 12:37 pm
   Permalink

   खरचं या भीती-भीतीनेच माणूस चार भीतीत अडकुन खरे जगणेच विसरला आहे……।।।।।। छान👍💐💐💐💐

   Reply
 • June 23, 2020 at 11:10 pm
  Permalink

  विषय मस्त👌👌👌👌 *डर के आगे जित है*

  आणि महत्वाचे म्हणजे *जहा से डर खत्म होता है.. जिंदगी वही से शुरु होती है*

  हे कळलं तर कुणीही डिप्रेशन मध्ये जगणार नाही…. आत्महत्या करणार नाही…….

  आजच्या काळात या विषयावर मोठया प्रमाणात लिखाण व्हायला पाहिजे…… अतिशय महत्वपूर्ण विषयावर लिखाण केले मॅडम तुम्ही…….. हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐

  खूप छान लिहिल्या मस्त👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami