अन् तो शेवटचाच फोटो…
मी लग्नानंतर जवळच्या नातेवाईकाकडे गेली होती.दुपारची वेळ काकू एकट्याच घरात बसल्या होत्या . काका- काकूंचा जोडीचा फोटो अधून-मधून आपल्या पदराने फूसत पुसत.फोटोच्या आठवणीतून त्या भुतकाळात रमल्या .. त्या म्हणाल्या की,
आयुष्याच्या चाळिशीनंतर पूर्वीच्याच कामावर आता ते पक्के झाले होते. येथूनच सुखाचे दिवस प्रारंभ झाले होते.त्यामुळे पुढे आता कुटूंबासाठी जगायचे असे नेहमीच बोलून दाखवित .आता आपण लग्नात न काढलेला जोडीचा फोटो काढण्याचे त्यांनी ठरविले होते. घरात किमान आपला एखादा तरी फोटो असावा असे त्यांना कित्येक वर्षाने वाटू लागले होते. मुलांसाठी आठवण म्हणून तरी आपण फोटो काढण्याची इच्छा पत्नीजवळ व्यक्त केली. फोटो नको,आता या वयात कशाला हवा जोडीने फोटो असे उत्तर काकूने दिले होते. परंतू शामराव मात्र कोणतेही कारण ऐकायला तयार नव्हते. .त्यामुळे अखेरीस पत्नीही जोडीने फोटो काढायला तयार झाली. आणि मग ठरले शहराला जाऊन ब्लैक अन्ड व्हाईट फोटो काढला. तोही काळा कोट घालूनच. रात्री जेवतांना फोटोविषयीच बोलत होते. परंतू त्याच्या बोलन्यातील भाव मात्र तेव्हा कळला नाही. आणि परत ते आपल्या कामा वर बाहेरगावी गेले.
दिवसामागून दिवस गेले…….. पंधरा ते वीस दिवसावरच दिवाळी येऊन ठेपली होती.त्यामुळे एकदाचा पगार मिळाला की,ते शहरातून फोटो घेऊन येणार होते.परंतू कदाचित ते नियतीला मान्य नसेल. त्यांची फोटोची उत्कंठा शिगेला गेली होती.तर दुसरीकडे घरच्यांनाही कधी बाबा येते ,याची आस लागली होती.एक-एक दिवस मोजत अखेरी येण्याचा दिवस उजाडला.आणि ते घरी येण्यासाठी निघाले होते.
परंतू त्याच्या नसिबात पुढे काय वाढून ठेवले होते?.हे त्यांनाही माहित नव्हते.पगाराची रक्कम घेतली.आणि दिवाळीच्या खरेदीसाठी गावाला जातो म्हणून चार-ते पाच दिवसाच्या सुट्याही साहेबांना मागितल्या होत्या.त्यामुळे आस लाऊन असलेल्या मुलांपासून तर आयुष्याची सोबत देणा-.या पत्नीलाही यावेळेस नवीन कपडे सोबत न्यायचे असे ठरविले होते. म्हणून शहरातून सर्वासाठी नवीन कपडे घेतले होते. नवीन कपड्याची पिशवी घेतली होती. .
बसथांबा एका हॉटेलजवळ असल्याने मुलांसाठी खाऊ घेण्याचे ते मात्र विसरले नव्हते.. हॉटेलमधीलच एका खाटेवर बसले होते .ते एस.टी.ची वाट पाहत होते. बस मागून बस आल्या अन गेल्या.परंतू त्यांच्या गावची बस अद्यापही आली नव्हती.दिवस बुडायच्या आत घरी यायचे या आसेपोटी ते वारंवार एस.टी.बोर्ड पाहत असे. शहरापासून पुन्हा 5 किमीचे अंतर पायी चालून जायचे होते.त्यामुळे घरी दिवस बुडायच्या आत पोहचेले तर किमान मुलांसोबत जेवन करता येईल.ही उत्कंठा त्यांना वारंवार अस्वस्थ करून जात असे.
परंतू नियतीचा खेळ काही आैरच होता. दरम्यान आलेल्या वादळी पावसाने हाहा:कार उडवून दिला होता. ज्या रस्त्यावरील हॉटेल मध्ये थांबले होते.त्याचेही छत उडाले होते.गावातील लाईन गेली होती.पाहता पाहता अंधारही पसरला .त्यामुळे आता तर एस.टी.बस येण्याची शक्यता मावळल्यातच जमा होती.त्यामुळे अखेरीस कार्यालयातील आपले वरीष्ठ कर्मचारी असलेल्या मानस बहिणी कडे रात्र काढायचे ठरविले होते. मानस बहिण ही माऊलीप्रमाणे होती.रात्रीचे जेवन आटोपले.अन एक-दोन तासाने ?छाती दुखायला लागली,.त्यामुळे झोप काही येईना ,उठ-बस सुरूच होती.माऊलीला त्याची तडफड लक्षात आली.रात्रीची वेळ,गावात डॉक्टरही नव्हते.काय करावे तिला कळत नव्हते.सुचेल ते उपाय,इलाज करीत होती.छाती शेकून दिली.परंतू त्याच्या वेदना कायम होत्या. अखेरीस दिवस उजाडला.सकाळची सात ची गाडी होती.या दुखण्यातही गावाची अन मुलाची आेढ काही सुटेना,त्यामुळे गावाला जाऊन दवाखान्यात जातो म्हणून,ते त्याच रस्त्यावरील हॉटेलवर आले. व खाटेवर बसले. यावेळेस बस वेळेवर आली. त्त्यांना दुरूनच गावाकडे जाणारी बस येतांना दिसली. त्यामुळे ते खाटेवरून उठले आणि पिशवी हातात घेऊन तयार होते.बस येऊन थांबली.प्रवासी चढले.तेही बसकडे जात असतांना तिथेच कोसळले. लोक गोळा झाले.अमुक-अमुक बाईचा भाऊ होय.हे एकाला माहित होते.तो लगेच धावत सुटला.बाई.बाई. तुमचा भाऊ गेला.ही खबर दिली. तिही आनंदी झाली. तिला वाटले भाऊ एकदाचा गावी गेला,या सुखद विचाराने…
पुन्हा लगेच एकजण धावत आला,बाई भाऊ खाली पडला,अन बोलतही नाही.हे एकून ती धावतच सुटली.गर्दीतून ती भावाकडे गेली.त्याला हलवित ती धाय मोकलून आकोश करीत होती. पण भाऊ मात्र कायमचा सोडून गेला होता. बहिणीच्या विलापाने उपस्थीतांचे होळ पाणावले .
शेवटी पुढाकार घेऊन कुणी गावाकडे माणूस धाडला.शेवटच्या क्षणापर्यंत कुटूंबाच्चीया भेटीची आस मात्र अपूर्णच राहिली होती. मुलांसाठी घेतलेल्या खाऊलाही मुंग्या लागल्या होत्या.नवीन कपड्याची पिशवीही तशीच होती. कुणास ठाऊक त्यांना मृत्यूची चाहूल लागली की काय म्हणून त्यांनी बायकोसोबत फोटो काढ्ण्याची हौस पुर्ण करून घेतली होती. परंतू हा फोटो मात्र त्यांना पाहता आला नाही. त्याच्या आयुष्यातील हा पहिला व शेवटचा फोटो ठरला होता. तो फोटोही त्यांना पाहता आला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वच चित्र बदलून गेले होते.सुनामी यावी आणि सर्वकाही उद्ध्वस व्हावे अशीच परिस्थीती झाली होती. मुलरूपी फुलांच्या पाकळ्या केव्हाच कोमेजून गेल्या होत्या. त्या फोटोकडे टक टक बघत .तो शेवटचा फोटोच आठवणीचा ठेवा होता.ते निघून गेल्यास आज 40 वर्षे पूर्ण झाली होती. परंतू आजही त्यांचा तो मृत्यूआधी काढलेला फोटो नातवांना आपले आजोबा म्हणून आेळख देत आहे.
धन्यवाद
Suparub tai khup chan lihilay. Ek ek ol vachtana aata pudhe kay honar yachi ek utkhnta hoti .khup sundar tai
Thanks
हृदयस्पर्शी लिखाण मॅडम , … सुंदर msg…. वेळ असतानाच सारं काही मनातलं करून मोकळं व्हावे….. आजचा दिवसच माझ्यासाठी शेवटचा समजून जगावे….. खूप छान msg मॅडम …..
अधुरं………….
धन्यवाद, यापुढील भाग तुम्हाला लवकरच वाचायला मिळेल
Aunty तुमच लिखाण माझ्या आजोबा विषयीच आहे हे सुरुवातीलाच काही ओळी वाचता क्षणी त्याची प्रचिती आली… वाचून डोळ्यात पाणी आलं. आई (आजी) होती तेव्हाच ती बाबा (आजोबा) बद्दल नेहमी सांगायची. लहान असताना तिनेच मला बाबांचा तो फोटो दाखवला. आणि मी कधीच न बघितलेल्या बाबा ची उणीव मला भासू लागली. आई ला मी नेहेमीच म्हणायचो बाबा असते तर त्यांनी माझे किती लाड केले असते ना. बाबांना कधीच न पाहता आल्याची खंत मला आयुष्यभर राहील….
वाचतांना डोळ्यात पाणी येतं.मनाला लागुन गेली गोष्ट