किमया

निर्मळ झ-यांना बांध घातले , गलिच्छ नाले प्रवाहित झाले.

शुद्ध हवा दुर्मिळ झाली ,दूषित हवा पसरत गेली.

कुणाला भुकेचे फाके पडले , तर कोणाचे अन्नधान्याचे गोदाम भरले.

हवे ते सर्व नष्ट झाले, नको ते प्रदूषण निर्माण झाले.

पण.. पण… अचानक कोरोना नावाचा अदृश्य विषाणू आला, व त्याने सर्वत्र कहरच केला,

पृथ्वीवरील या प्रदूषणाचा विळखाच हटला.

थांबले उद्योग थांबल्या सर्व चाकी त्यामुळे श्वासही मोकळा झाला .

गंगेच्या पात्रातील केरकचरा हटला, नदीच्या पाण्याचा प्रवाहही खु ल ला.

चिमणी पाखरे वस्तीत वळले, त्यांचा हा चिवचिवाट व मुक्त संचार ही वाढला.

या वसुंधरेवरील सर्वच जीवसृष्टी प्रफुल्लित झाली. कोरोना ने या चमत्काराची सुरुवात अशी केली.

यापुढे, आता आपण सर्वांनी ही जबाबदारी घेऊया,

मिळाली ही सुवर्णसंधी लाभ त्याचा घेऊन ,सर्वांनी हा संकल्प करूया

कोरोना हटवून ,प्रदूषण मुक्त पृथ्वी नवीन पिढीसाठी अशीच जपून ठेवूया.

मीना रामटेके,चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami