धावा बोल

सायंकाळची वेळ होती. मी बाजारातून घरी येत असताना लवकर घरी पोहोचता यावे म्हणून मी माझी गाडी आडमार्गाने वस्तीतून टाकली. रस्त्यावरून घराच्या दिशेने जात होते.परंतु रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती त्यामुळे मी गाडी थांबवली समोरून म्हशीचा कळप रस्ता ओलांडत होते. त्या कळपाच्या मागे 3-4 लहान मुली शेन उचलायला धावत होत्या. शेन आपल्याला मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. हा प्रसंग बघून शेनाचे महत्व आणि त्यासाठी लागणारी धावपळ दिसली.

गावाकडे प्रत्येक घरासमोरील अंगणात सडा ,कुडाच्या भिंतीला लिपणे, घर सारवने .घरातील या कामासाठी दररोज त्यांना शेन लागते.शेणाच्या सळ्यामुळे अंगण गुळगुळीत राहाते. त्यावर सुंदर रांगोळी हे पाहून मन आनंदी व्हायचे. या अंगणातच मुले खेळत बागडत आणि शेजारीपाजारी महिलांच्या गप्पा गोष्टींसाठी बैठकीचे ठिकाण अंगणातच असायचे.

अधून-मधून शेजारील काकू गुळगुळीत अंगणाचे गुणगान करायचे त्यामुळे हुरुप यायचा. पण हे सर्व करण्याकरिता मात्र आदल्या दिवशी सायंकाळीच शेन जमा करून ठेवावे लागत असे .याची कामगारी बाल मैत्रिणी यशस्वीपणे पार पाडत होत्या . सायंकाळ होण्यापूर्वीच सर्वजणी गोळा होऊन, एकत्र होत झेपेल इतक्या लहान लहान बकेट घेऊन जात.

गावात एक मोठे शंकराचे मंदिर होते . त्याच्यामागे भलेमोठे तळे त्या तळ्याच्या मागून नर्सरी व जंगल सुरु होत होते .म्हणून त्या तळ्याच्या काठा पासुनच गायी-म्हशी गावात येत होत्या. त्यांचा हा रस्ता नेहमीचा .त्या तळ्यावर रोज महिला कपडे धून्या करिता जात होत्या. म्हणून त्या रस्त्यावर दिवसभर महिलांची ये जा असायची म्हणून भीतीचे कारणच नव्हते. यातच सर्व मैत्रिणी शेना च्या बहाण्याने एक तास आधीच मंदिराच्या मागे तळ्याच्या जवळ खुल्या पटांगणात जाऊन गाई-म्हशीचे वाट बघत रहायच्या . व तेथे एक तास सागरगोट्या, लंगडी,लगोरी खेळत बसायच्या. लांबूनच म्हशीचा कडप येताना दिसला की खेळ सोडून बकेट घेऊन धावा बोलून म्हशीच्या दिशेने सुसाट धावायच्या. शेंन गोळा करत करत त्या गाई-म्हशीच्या मागे मागेच घरापर्यंत यायच्या. शेन झाकून ठेवून भरपूर शेण भेटल्याचे समाधान वाटायचे तोपर्यंत घड्याळात सात वाजून जायचे घरी आईचा स्वयंपाक तयार असायचा लगेच हात पाय धुऊन जेवण करून ,अभ्यासाला बसायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात पडलेला सडा आणि स्वच्छता पाहून प्रसन्न वाटायचे.

गावाकडे सणासुदीच्या दिवसात शेेनाचे वेगळेच महत्व असायचे. होळीच्या सणाला शेनाच्या चाकोल्या तयार करून त्यांचे हार बनवायचे व होळीत जाळत होते. दिवाळीला ही गावात अंगणात शेनाची गौरी थापून त्याची पूजा करत असे.

परंतु आजच्या या सिमेंटच्या जंगलात घराला अंगण नाही. ..अंगण नाही म्हणून सडा नाही…सडा नाही म्हणून शेनही नाहीच नाही…आणि जेथे अंगण आहे तेथे ही फरची…

गावात अनेक महिला या शेनापासून गोवऱ्या थापायच्या, व चूल पेटवताना गोवऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. इतकेच नव्हे तर सायंकाळी मच्छरांचा गोंगाट पळवण्यासाठी घमेल्यात धुरांडा करायचा. ही प्रथा गावात कमी-अधिक प्रमाणात आजही दिसून येते.

जनावर जंगलात विविध झाडांचा पाला खात असे त्यामुळे शेनालाही आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचे आजी-आजोबा सांगत असे. भारतीय संस्कृतीत शेनाला महत्त्वाचे स्थान आहे.

माणसाच्या जगण्या बरोबरच मरणानंतरही गोवऱ्या सोबतीला असतात . तिरडीच्यावर मानेच्या आजुबाजूला गोवर्‍यांचा आधार दिला जातो. आणि अंत्यसंस्काराच्या वेळी सरण रचता नाही ही शेनाच्या गोवऱ्या सोबतीला असतात. त्यामुळे शेनाला ही एक आगळेवेगळे महत्त्व आहे .

आज अनेक जण शेन दिसताच त्रागा करतात. परंतु या सिमेंटच्या जंगलात शेन दिसले की कपाळावर आटया येत असल्या तरी आपण या शेणाच्या म्हणजेच गोव-याच्या सहाय्यानेच अनंतात विलीन होणार आहोत. हे विसरू नये

आज विज्ञान युगातही गावांकडे शेनाचा वापर होताना दिसतो.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami