फिटनेसचा खटाटोप
भरपूर पैसा, चैनीच्या वस्तू, सुखसोयी साठी भौतिक साधने यामुळे अनेकांची जीवनशैली बदलून गेली. शारीरिक श्रम कमी आणि बैठे काम जास्त अशा दिनक्रमामुळे विविध आजाराने शरीरात घर केले आहे .पैसा असूनही निरोगी जगता येत नाही शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी अलीकडे शहरात आणि महानगरांमध्ये पुरुष आणि महिलांसाठी फिटनेस सेंटर ,म्युझिकल योगा (फास्ट योगा) आणि झुंबा ( संगीतमय व्यायाम) सेंटर उघडले. आहे.
जिम मध्ये अधिक तर युवकांचा भरणा असला तरी झुम्बा आधुनिक काळातील झुम्बा सेंटरमध्ये महिलांची गर्दी वाढली आहे. अधिक तर शारीरिक श्रम न करता संगीताच्या तालावर थिरकत व्यायाम करण्यास अधिक रस वाटतो. हे केंद्र सदन घरच्या महिलांसाठी आकर्षण ठरू लागले आहे. सकाळच्या सुमारात चहा घेऊन झुम्बा ला जायचे आणि दिवसभर आराम करायचे व घरातील अन्य कामे कामवाली बाई लावून करून घेणे . शरीर सांभाळण्यासाठी प्रयत्न होतो परंतु शारीरिक परिश्रम न झाल्याने झुम्बा तुन चरबी किती कमी होते. ज्यांचा त्यांचा विषय…
आमच्या आपारमेंट जवळील रस्त्याच्या कडेला काही महिन्यांपूर्वीच महिलांचे झुंबा सेंटर झालं सुरू झाले. सुरुवातीला हे सेंटर कुतूहलाचा विषय होता. परंतु कालांतराने कुतूहल संपले.
दोन दिवसापूर्वी माझी आजी माझ्याकडे भेटायला आली होती. ती मूळची काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबातील शेतीतील कामे ,नदीवरून पाणी भरणे , जात्यावर दळण दळणे . या कामातून तिचे तारूण्य केले. आज ती 80 वर्षाची परंतु आजही तिची शरीरयष्टी शाबुत आहे .दात व्यवस्थित आहे ,कान ,डोळे आणि डोक्यावरील केस तरुणीला हेवा वाटावे इतपत शाबूत आहे .
सकाळचे नऊ वाजले होते फ्लॅटच्या गॅलरीत आम्ही बसलो होतो. .तेवढ्यात झुम्बा चा क्लास आपटून तीस ते पन्नास वर्षे वयोगटातील दहा-पंधरा महिला पावले टाकत बाहेर पडल्या. आजीला कुतूहल वाटले येथे काय आहे ग ? असा प्रश्न विचारला .
मी सांगितले झुंबा क्लास आहे हे शब्द तिच्या डोक्यावरून गेले होते . हा कशाचा झुम्बा, तिने परत विचारले, संगीताच्या तालावर नाचत व्यायाम करणे म्हणजे झुम्बा होय यासाठी पैसेही मोजावे लागतात. हे ही सांगितले हे ऐकून तिचा माता भडकला . शहरातल्या लोकांना घरचे काम करणे जीवावर येतात आणि शरीर पोसूून ते व्यायाम करायला जातात. अशी ती पुटपुटली……
आम्ही शरीर कसे सांभाळले याचा तिने पाढाच वाचला. घरी बारा बैलाची शेती होती. दूध तूप बारा महिने घरी पडलेले असे. शेन वेचायला माणसं यानंतरही आम्ही शरीर कधी पोसले नाही .नदीवर जाऊन धुणीभांडी करून शेतावर जात .आम्ही कधीच शरिरावर चरबी जडू दिली नाही.आता मात्र चित्र उलट झाले आहे तिच्या बोलण्यात मला गांभीर्य आणि तथ्यही वाटले. काही टक्के वगळता आजही काही घरकाम सांभाळून फिटनेस जोपासणारे लोक आहेत .स्वतःची आणि घरातील कामे स्वतः सांभाळली तर त्यात काय वाईट बरे ….आजीचा हा प्रश्न अंतर्मुख करणारा ठरला .
Sunder vishay
Thanks