नातीगोती

बाबा आणि त्यांचे मित्र अगदी बालपणापासूनचे. लगोट यार म्हटले तरी चालेल. आखाड्यापासून ते आजही त्यांचे नाते कायम आहे. आता दोघांनीही साठी आेलांडली असेल. त्यांचे नाते हे रक्ताचे नव्हते.परंतू रक्तापेक्षा श्रेष्ठ असेच नाते म्हणावे लागेल.अगदी चढ-उतारच्या दिवसातही दोघेही एकमेकाच्या खंबीर पाठीशी कायम राहिले.आताही.त्यामुळे रस्त्यावरून ते महालापर्यंतचे जीवन त्यांनी अनुभवले.बाबा आणि त्यांच्या मित्राचे नाते आगळेवेगळे आहे.त्याला कसलीही तोड नाही.अरे –तुरेच्या एकल स्वरात होणारी त्यांची बोलणी ही त्याच्या घट्ट नात्याची जाणीव करून देणारी आहे.

जीवाभावाच्या मैत्रीवरून मला नेमके नाते म्हणजे तरी काय? याविषयावर खोलात जाण्याचा प्रयत्न केला.नात्याचा जन्म हा जन्माबरोबर होतो.जन्मानेच अनेक नाती सोबत येतात.आई-बाबा ,बहिण, भाऊ,काका,मामा,वैगेरे वैगेरे…. व्यक्ती जस जसा मोठा होत जातो.तसे आणखी नात्यांचा गोतावळा वाढत जातो.समजण्याइतपत मोठा झाला की, मित्रत्व या नात्याची भर पडत असते. त्यापुढे आणखी पुन्हा बौध्दीक दृष्टया आणि वैचारिकदृष्टया परिपक्व झाला की,काही निवडक नाती ही घट्ट होते.आणि ती अखेरपर्यंत टिकून राहते.त्या नात्यात कसलाही स्वार्थ नसावा.

नाते हे एक दुस-यासोबत जुळण्यासाठी भावनेची जाणीव असली की त्या नात्यांचा वेल वाढत जातो.नाती टिकून राहण्यासाठी संयम,प्रामाणिकपणा,आत्मियता,विश्वासाची आवश्यकता आहे. सध्या तर नाती जोपासणे कठीण झाले आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात बहुमुल्य नाती ही कुठेतरी मागे पडत चालली आहे. जीवन जगतांना नाती बरी मागे पडतात.शिकले-सवरले की, पैशाच्या हव्यासापोटी नाती हे केवळ आैपचारिकपणे पाळणारे समाजात कमी नाही.अनेक जण अचानक भेट झाली म्हणून केवळ स्मीत देऊन पुढे चालतात. अशी नाती केवळ आेळखीचे स्वरूप असते.

अनेक नाती पैशामुळे टिकून रहाते,असे माझे वैयक्तीक मत आहे.बडा रूपया असला तर आपोआपच अवती-भवती फिरणा-यांची संख्या वाढते. श्रीमंत व मोठा कारभारी असला की,सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्याच्या अवती-भवती भेटणा-याची सारखी गर्दी असते.ही नाती परिस्थीतीजन्य असते,असे मला वाटते.ती टिकून राहणारी नसते.त्या नात्यात निष्ठा असते असे नाही. या व्यक्तीगत स्वार्थ पुर्ण करायचा आणि तो एकदाचा पुर्ण झाला की,विसरून जाण्याचा अधिक कल असतो. असे लोक संवेदना आणि भावनांना फारसा थारा देत नसतात.

काही नाती ही एका दिवसाच्या भेटीची असतात.त्यातील अनेक नाती ही काळाच्या आड दडून जातात. पण काही नाती ही एक दिवसाच्या भेटीतून इतकी घट्ट होतात की,अगदी रक्ताच्या नात्यासारखी वाटतात. असा अनुभव मला वारंवार आला.स्पर्धा परिक्षांच्या काळात नागपूरला जातांना,येतांना किंवा परीक्षा केंद्रावर आेळख झालेल्यांचे नाती आज घट्ट झाली आहे.अगदी अभ्यासाच्या गोष्ठीपासून तर सुख-दुखः भावना व्यक्त करण्याइतपत आपुलकीची वाटतात.कोर्टाच्या परिक्षेत कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी न्यायालयाच्या मैदानात शिरलो. मोनाली ची दुमजली पायरा चढतांना झालेली भेट एक-एक धाग्यांनी विनत गेली.त्यानंतर दोन ते चार वेळा प्रत्यक्ष भेट झाली असेल पण आजही आमचे नाते कायम आहे.वर्षानुवर्षाचे संबंध व आेळख असल्याचा भास होतो.अशीच दुसरी भेट नागपुरातच परतीच्या प्रवासात बस मध्ये महिलेशी ( अर्चनाशी )भेट झाली.पेपरविषयी बोलता बोलता विषय कौटुंबिक विषयापर्यंत पोहचला.एवढेच प्रत्यक्ष बोलणे.दोघींनीही एकमेकांचा संपर्क नंबर घेतला.महिन्यात दोनवेळा तरी मन मोकळे करीत असत.

जीवन जगतांना नाती कायम आहे.नात्यांना किंमत असली पाहिजे.नात्याशिवाय जगणे म्हणजे शुष्क जीवन होय.नात्यांना सुंगध हवा.नात्यांनी श्वास घेतला तरी सुंगधाने भरून जगता आले पाहिजे. समविचारी आणि एक स्वप्ने पाहणा-या पती-पत्नीचे नाते श्वासासारखे वाटते.बाळाच्या जन्मानंतर आईचे नातेही मातृत्वाचे .या नात्याला काळजी,जबाबदारी,वात्सल्य असते. रेशमाच्या बंधासारखे नात्यांना अनेक रंग आहेत.नात्यात पवित्रता असली पाहिजे.नात्याला काळीमा फासली की,ते नाते दुषित होऊन जाते.दोन विचारसरणीचे भावबंधातून तयार झालेल्या नाते जिवनात प्रामाणिक जपा.आयुष्य जगतांना अधिक सुगंध येईल.आनंदाची बाग अधिक फुलत जाईल.

3 thoughts on “नातीगोती

  • June 27, 2020 at 8:26 pm
    Permalink

    उत्कृष्ट लिखाण . माझा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami