चेहरा वाचन

समाजात वावरताना अनेक जण भेटतात. त्याची ओळख होते परंतु कधीकधी ओळखीच्या माणसाकडूनच फसवणूक होण्याची शक्यता असते कारण त्याला आपण ओळखले नसते त्याला ओळखता न आल्याने कधीकाळी आपली डोकेदुखी वाढते. त्यामुळे आयुष्यात माणसे ओळखता आले पाहिजे. माणसे पुस्तकाप्रमाणे वाचता आली पाहिजे. त्यातून बरेच काही शिकायला मिळेल आणि समस्यांपासून दूर राहता येईल एक तर ग्रंथ वाचून माणसाची परख करता येईल किंवा आयुष्याच्या वेगळ्या अनुभवातून आपल्याला माणसे ओळखता येईल पूर्वी निरक्षर लोकही मोठ्या खुबीने माणसे वाचायची. अगदी पहिल्यांदाच माणूस पाहिल्याबरोबर तो अभिप्राय देत असे. पूर्वी मुलगी किंवा मुलगा पाहण्याच्या कार्यक्रमात घरातील ज्येष्ठ मंडळी आवर्जून उपस्थित राहायचे आणि बैठकीतच उपवर आणि वधूच्या सभा विषयी माहिती देत असत. त्यांचा हा अनुभव जवळपास 90 टक्के खरा ठरत. सांगायचे तात्पर्य की ग्रंथवाचन आणि अनुभवाच्या अक्कल आकलनातून माणसे ओळखली जात होती. त्यामुळे आतासारखी पूर्वी फारशी लोकांची फसवणूक होत नव्हती.आज परिस्थिती बदलली आहे केव्हा देखाव्यालाच महत्व देऊन एखाद्या व्यक्तीकडून सहजपणे फसविले जाण्याचे प्रकार वाढू लागले आहे.

सद्यस्थीतीत मनोरंजनाच्या साधनात भरमसाठ वाढ झाली आहे. क्षणाक्षणाला वेगवेगळी साधने उपलब्ध करू शकतो.टेलीव्हीजनवरून एका रिमोर्टवरून अनेक मनोरंजनात्मक चैनल्स पाहू शकतो. परंतू त्या मनोरंजनाला मर्यादा येतात त्यातून मिळणारा आनंद हा क्षणिक टिकणारा असतो. त्यानंतर पुढे काय?असा प्रश्न उपस्थीत होऊन घराबाहेर पडतो. मनोरंजनाची कितीही साधने वाढली तरी त्यातून मिळणारा आनंद फार वेळ टिकून राहत नाही. मनात प्रश्नाचा काहूर माजला असेल तर ही मनोरंजनाची साधने निरूपयोगी वाटतात.आपल्या अस्थीर मनाला केवळ पुस्तक वाचनातून स्थीरता मिळू शकते.ग्रंथ,पुस्तके,महापुरूषांची आत्मचरित्रे,त्याचे विचार ,किंबहूना आपल्या क्षेत्रानुसार आवडीचे पुस्तके वाचनारा आनंद हा मनोरंजनाच्या साधनापेक्षा अधिक असतो.

समाजात,नोकरी पेशात वावरत असतांना अनेक प्रकारची माणसे,महिला भेटत असतात. परंतू त्यांना आेळखणे तितकेच कठीण असते. कधी काळी रक्ताची नातेही ,व्यक्तीही आेळखणे कठीण होऊन जाते.तिथे बाहेरच्या माणसाचे काय?.प्रेमात युवतीची फसगत अशा,बातम्या वर्तमानपत्रातून अधून-मधून निदर्शनास येते.केवळ बाह्य आकर्षक रूप,महागडे कपडे,आणि स्वभावात लाळीवाड पणा पाहून भुरळ पडणारेही काही कमी नाही. त्याचे ते बाह्य रूप आहे. परंतू खरे रूपापासून दूरच राहतो. बाह्यकरणी दिसणा-या रूपाला बळी पडून नंतर त्याच्या नावाने बोटे मोडणारी आपण पाहतो. या उदाहरणामागील एकच हेतू तो की, पुस्तकाप्रमाणे आपल्याला माणसे वाचता यायला हवी,परंतू समाजात वावरतांना किती लोकांना माणसे वाचता येतात. माणसे वाचता न आल्याने आपली फसगत होते,किंबहूना मनाला त्रास होतो. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला जीवनाचा अर्थ कळतो,वाचनामुळे आपले अनुभव व्यापक होते. आणि आपली अभिरूची संपन्न होते,यासाठी विविध विषयावरचे ग्रंथ वाचन करणे आवश्यक आहे.ज्या समाजात आणि ज्या लोकांमध्ये आपण वावरत असतो ,त्या लोकाचे चेहरे आणि मन देखील वाचता आले पाहिजे.

सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे.खुप प्रगती झाली आहे, त्यामुळे जगातील कुठलेही पुस्तक आपण सहजरित्या मिळू शकतो.आणि वाचू शकतो.प्रत्येकांने जीवन जगत असतांना वाचनासाठी काही वेळ राखीव ठेवण्याची गरज आहे.परंतू सध्या टेलीव्हीजनसाठी अधिक वेळ राखून ठेवतो. पुस्तके अडगळीत पडलेली असतात .नाहीतर शो केजच्या शोभा वाढवित असतात. ग्रंथ वाचनातून प्रगल्भता वाढता,तुमची विचार करण्याची शक्ती वाढते,सुख-दुखाच्या घटनांमध्ये मनाला सावरून योग्य निर्णय घेण्याचे बळ प्राप्त होत असते.अवती भोवती घडणा-या घडणावर पाहण्याचा दृष्टीकोनही वाचनाच्या समृध्दीतून बदलत असतो. पडत्या काळात तुम्हाला सावरणारे ग्रंथ वाचनच असते.आेळखीची किंवा नातेवाईक सहानुभूती,आपलुकी दाखवीतील.काही दिवस मानसिक आधार,बळ देतील.परंतू ते सावरण्याचे पोषक वातावरण ते वाचनामुळे प्राप्त होते. ग्रंथ वाचनाप्रमाणे आपल्याला माणसे वाचता आली की,आपल्याला जग जिंकता येईल,सुरक्षितपणे जग पादाक्रांत करता येईल.मग तुमच्या सहवासात कितीही माणसे,महिला येवोत ती आेळखता आली तर त्यांचा मुळ स्वभाव आेळखू शकाल,त्याची सुख-दुखः आपण समजू शकतो.दुस-यांना मदत करतांना होणारी फसगत टळते.

5 thoughts on “चेहरा वाचन

 • July 1, 2020 at 8:31 am
  Permalink

  बहुत बढ़िया दीदी मस्त .

  Reply
 • July 3, 2020 at 8:36 am
  Permalink

  अप्रतिम वास्तविक मनोगत

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami