पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह

कोरोनाने समाजमनात अनेक बदल धडवून आणले आहे.शिक्षण,लग्नसोहळा,सामुहिक कार्यक्रम आणि मुक्तपणे संचार करणा-यावर ही बंदी आली आहे. कोरोनाच्या लढ्यात पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह हे दोन शब्द कधीही न विसणारे आहे. येणारी नवी पिढीही कधीही विसणार नाही.

वास्तविक पाहता आयुष्यात पॉझिटिव्ह या शब्दाने सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. निश्चीत,मनाला उर्जा निर्माण करणारा असतो.म्हणून वैद्यकीय विभागात किंवा ज्येष्ठ मंडळी काहीसे नैराश्य आलेल्या व्यक्तीला बी पॉझिटिव्ह,सकारात्मक विचार करा,मोठ मोठी संकटे गारद होतील.मन घट्ट करा. असा सल्ला दिला जात असे,त्याच्या या सल्ल्याने पाझिटीव्ह विचाराने अंगात नर्वी उर्जा येत असे.

निगेटीव्ह म्हणजे नकारात्मक ,हार पत्कारलेला असाच दृष्टीकोन तयार होतो. निगेटीव्ह विचार सरणीही कंटाळवाणी ठरते,अशावेळी आपण त्याच्यापासून दोन हात दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. पुर्वी जिवनात पाझिटिव्ह आणि निगेटीव्ह ही शब्द क्वचितच ऐकायला मिळत असायची पण..सद्या कोरोना संकटाच्या काळात तर मागील मार्च महिन्यापासून दररोज पॉझिटीव्ह व निगेटीव्हने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे.आज या शब्दाचा अर्थही विरोधाभास निर्माण करणारे आहे. कोरोनाने पॉझिटीव्ह शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. संपुर्ण जग या शब्दाने ग्रासले आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.या शब्दाने शहर हादरून जाते. त्या घराभोवती परिसरात भूकंप आल्यासारखी स्थीती असते.अनेकाच्या मनात धडकी भरली जाते. आज कोरोना प्रादुर्भावाच्या काळात वृत्तपत्र,दुरचित्रवाहिणी व बोलण्यातून सातत्याने पॉझिटिव्ह शब्दचा अधिक वापर होत आहे.

सध्या पावसाळी स्थीती असल्याने महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात अधिकाधिक पॉझिटीव्ह रूग्ण आढळत असल्याने पॉझिटीव्ह हा शब्द मानसिक स्थीती आणि हद्याचे ठोके वाढवून चिंतेत भर टाकणारा आहे.

कोरोनामुळे आज निगेटीव्ह हा शब्द दिलासा देणारा आहे. कोरोना अहवाल निगेटीव्ह आला,असे ऐंकूनही नागरिकांना दिलासा देऊन जातो. कोरोनामुळे उपरोक्त दोन्ही शब्दामुळे मानवी स्वभावावर त्याचे परिणाम वेगवेगळे उमटणारे आहे.

आमच्या वार्डापासून तीन कि.मी. अंतरावर नागपूर येथून प्रवास करून आलेल्या युवतीला अलगीकरणात ठेवले गेले.स्वैब घेऊन तिचा नमुना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांचे जगणे व वागणेच बदलून गेले. पॉझिटिव्ह या शब्दाने त्या कुटूंबाशी तिरस्कार,वागणुक किंबहूना बहिष्कार टाकल्यागत वागणुक वाट्याला येते.त्यामुळे त्यांच्या घरातील प्रत्यक्ष निगेटीव्ह असलेल्या अन्य सदस्यांवर त्याचा मानसिक परिणाम पडत असतो.दुदैवाने पॉझिटीव्ह रूग्णांचा मृत्यू झाला तर रक्तांची नातेही त्याला दुरावली जातात.इतका भयंकर त्याचा मृत्यू ठरतो.साध्या मृत्यूने टाहो फोडणारे,विलाप करणारेही कोरोना मृत्यूने घरच्याच कोरोनाबळीशी वै-यासारखी वागणुक होते.अनेक कुटूंबातील सदस्य तर दुरूनच अंतीम दर्शन घेऊन पोलिस किंवा सांभाळ करणा-या यंत्रेणेला परस्पर अंत्यविधी करायला सांगतात.ऐरवी सोबत जगलेल्यांची ही पॉझिटीव्ह कोरोना मृतकांशी बदलेले नातेही मनाला वेदना देणारे ठरते.

परंतु जेव्हा एखादा पॉझिटिव्ह रुग्ण विलगीकरण कक्षात राहून काही दिवसांनी जेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव येतो हा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन तो जेव्हा बाहेर निघतो. तेव्हा दवाखान्यातील सर्व स्टाफ टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करतात. जणू त्याने एखादा शूर पराक्रम गाजवला आहे म्हणजेच कोरोना या भयंकर आजारावर मात करून तो आयुष्याच्या लढाईत जिंकलेला असतो. याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत असते त्याच्या या निगेटिव रिपोर्ट मुळे सर्वांमध्ये सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली असते .

अशाप्रकारे जीवनात पॉझिटिव्ह शब्द हा कोरोना काळात नकारात्मकता व निगेटिव हा शब्द सकारात्मकता जाणवतो अशा या शब्दांचा अर्थच बदलून गेलेला आहे.

One thought on “पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह

  • July 20, 2020 at 7:12 pm
    Permalink

    अगदी बरोबर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami