शाळा घरातील

मानवाच्या जीनवचक्राला कलाटली देणारे संकटे फार क्वचीत वर्षानी येतात. सद्यस्थीतीत जगावर कोरोनाचे संकट आेढावले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव अनेक देशाची अर्थचक्रे थांबली आहे.तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे उद्योग चक्र,विकास,मानवी विकास खुंटला आहे. रोजगार,नोकरी,आणि शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहे.त्यामुळे शाळेतील सामुहायिक शिक्षणाचे संदर्भच बदलून गेले आहे.सध्यास्थीतीत राज्यात २६ जुन पासून शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. परंतू यंदा प्रथमताच शाळेची पहिली घंटा वाजली ती विद्यार्थीविनाच.शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला आहे. घरात राहून मोबाईल, काम्पुटर किंवा अैपच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सींग व सुरक्षित वातावरण ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. परंतू ग्रामिण शिक्षणाचे काय? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षक की,घरपोच शिक्षण अशा दोन संकल्पना म्हणजेच पर्याय समोर आले आहे.

यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक साखळी खंडीत झाली आहे. मार्च महिन्यात देशात महामारी कोरोनाने धडक दिली.त्यामुळे २२ मार्च रोजी जनता कर्फ्य,त्यानंतर २४ मार्चपासून देशात संचारबंदी जाहीर केली. जवळपास तीन ते साडेतीन महिने संचारबंदीतच गेले. मार्च महिन्यात काही मुलांच्या परिक्षा सुरू होत्या.तर काहींच्या आटोपल्या होत्या. पण कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सुट्टया देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कोरोना व उन्हाळी सुट्ट्या घरातच गेल्या. पाहता-पाहता जुन महिना उजाडला तरीही कोरोना सुट्टया संपल्या नाही. विदर्भात २६ जुन पासून शाळेचे नविन सत्र सुरू होते.परंतू कोरोनामुळे हे सत्रही खोळंबले आहे. शहरी भागातील शाळांतून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर करून मुलांना घरबसल्या शिक्षण सुरू केले.अभ्यासक्रमानुसार होमवर्कही देणे सुरू झाले.

ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारतांना अनेक शाळांनी पीडीएफ स्वरूपातील पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली. पालकांचे व्हॉट्स ऍप ग्रूप तयार केले गेले. कुणी यू ट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले, तर कुणी व्हॉट्स ऍप ग्रूपवर टाकले. कुणी स्काइपचा वापर करताहेत, तर कुणी झूमसारख्या ऍपचा वापर करत आहेत. येनकेनप्रकारे आहे त्या परिस्थितीत येत्या नवीन वर्षाचा पाठ्यक्रम शिकवण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत थांबलेल्या जगाने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.शिक्षण क्षेत्रात आनलाईन शिक्षणाचा नवीन प्रयोग होय.त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रारंभीच्या काळात समजण्यात किंवा त्याचे आकलन करण्यात कठीणच जाणार आहे.कारण वर्गात बसून सामुहिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांवर आता कोरोनामुळे घरातच एकट्याने शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.हे जेवढे विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे तेवढेच पालकांसाठीही. ऑनलाईन शिक्षणाला जिवंतपणाचा स्पर्श नाही,अशी आेरड होत आहे. एका अर्थाने त्याची आेरड ही वास्तव वाटते. कारण जिथे वर्गातच मुलांना ‌विषयाचे आकलन होणे कठीण होते.तिथे ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्याचे लक्ष कसे लागेल,त्याची एक्रागता किती वेळ टिकून राहणार?असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थीत झाले आहे.

शिक्षण क्षेत्रातही अनेकवेळा नवनवीन प्रयेाग करण्यात येतो.यात प्रारंभीच्या काळात अनेक अडचणी येतीलच परंतू एकदाचा गोंधळ दूर झाला की, सुरक्षित होईल.पण कोरोनावर मात करेपर्यंत शिक्षणाचे चक्र सुरू केले आहे. आता यात किती यश मिळते हे तर येणारी वेळच सांगणार आहे.

ग्रामिण भागातील शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहे. ग्रामिण भागात अनेक विध्यार्थ्यांच्या पालकांकडे साधी टिव्हीही उपलब्ध नाही.तिथे स्मार्ट फोन कसा उपलब्ध होणार,समजा मोबाईल असेल पण त्याचा नेटचा खर्च कसा पेलवेल,त्यांचेकडे नेटपैक असतेच असे नाही.किंबहूना नेटपैक असेलही पण तिथे कवव्हरेज असते काय? हा प्रश्न ऑनलाईन शिक्षण घेतांना भेडसावणारा आहे.

One thought on “शाळा घरातील

  • August 3, 2020 at 9:07 am
    Permalink

    ग्रामीण भाग हा सर्वच बाबतित दुर्लक्षित भाग आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami