सोशल मीडियावरील कोरोना
भारतात मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने सक्रीय प्रवेश केला,तेव्हापासून देश थांबला आहे.येथील जीवनचक्राचा वेग मंदावला आहे.माणसाचे जगणे कठीण होऊन मृत्यू स्वस्त झाला आहे.जगण्याचे,सामाजिक हालचाली,आणि जगण्यातील बिनधास्तपणाला ब्रेक लागला आहे.देश आणि नागरिक अद्यापही कोरोनाच्या तडाख्यातून सावरले नाही. केवळ घरातच राहा,कामाशिवाय घराबाहेर पडू नका,एवढेच जगणे सिमीत झाले आहे.परंतू जगायचे कसे ? हे मात्र कुणीच सांगत नाही.घरात अठराविश्व दारिद्र्य असतांना कसे थांबायचे,एकीकडे घरात मृत्यू आणि बाहेर कोरोनामुळे मृत्यू ,दोन्हीकडे मृत्यू आहे.या मृत्यूच्या चक्रव्युहातच माणसाचा श्वास कोंडतो काय?.पण त्याचे कुणाला सोयरे सुतक.?
टेलीव्हीजन,वर्तमान पत्र आणि सोशल मिडीयावरील कोरोना परिणाम,संख्या आणि मृत्यूविषयांने माणसाचे डोके आणि मन अक्षरशा पिळून गेले आहे.माध्यमावरून जनजागृती आणि विश्वासार्ह बसेल अशी माहिती मनाला बिबंवेल अशी खात्रीलायक माहितीचा अभाव आहे.मग ज्याच्याकडे जशी माहिती पोस्ट व्हायरल उपलब्ध होते,त्या अनुषंगाने विचार,भिती उत्पन्न होत आहे.अशा प्रचार-अप्रचाराने सामान्य माणूस वैतागून गेला आहे.काय खरे आणि काय खोटे,या देशात नेमके चालले तरी काय?असा अनेक नागरिकांना प्रश्न भेडसावत आहे.परंतू त्याचे निराकण करण्यासाठी अधिकृत संस्था,एजन्सी किंवा सरकारी यंत्रणाक़डून कोणताच पुढाकार होत नाही.त्यामुळे माणूस आणखी हतबल होतो आहे.
मागील काही दिवसापासून सोशल मिडीयावर कोरोनाविषयी,अर्थात कोरोनाच्या नावावर खाजगी रूग्णालयात होणारे आर्थीक लुट,अन्य आजारापेक्षा अचानक कोरोनामुळे होणा-या मृत्यूचे चिंताजनक प्रमाण,केवळ गरीब कोरोनाला सर्वाधिक का बळी पडतो.आणि कोवीड सेंटर मध्ये गरीब कोरोना रूग्णांची होणारी परवड अशा विविध व्हायरल होणा-या पोस्टमुळे आमआदमीला वेड लागण्याची वेळ आली आहे.
काल परवाच एक व्डीडीआे व्हाट्सअप वरून व्हायरल करण्यात आला.दोन महिला अक्षरशा:दयावया करीत नागरिकांना केविलवाणे आवाहन करीत होत्या.आपल्या देशात सर्वसामान्यांचा नमुना अहवाल येण्याच्या आधीचा कसा मृत्यू होतो,त्यातुलनेत एखादा सेलीब्रीटीची चाचणी तब्बल पाचवेळाही पॉझिटीव्ह येऊनही ती कशी सईसलामत्त निगेटीव्ह होते,बरी होते.
दुसरा व्हीडीआे डोक्याला झिंग्या येणारा होता.सामान्य आजारालाही कोरोनातच समावेश करून रूग्णाला भरती केले जाते.त्याला एखादाचे उलचून नेले की,तो घरी सुखरूपपणे परतेल याची श्वासवी नाही.अनेक घटनांमध्ये थेट मृत्यूची बातमी सांगीतली जाते.त्याचे शवही पैक केले जाते,त्यामुळे घरच्यांना आपल्याच माणसाचे अंतीम दर्शन घेणेही कठीण होऊन बसले आहे.कोरोनामृत्यूने कुटूंबातील सदस्य आधीच भयग्रस्त झालेले असल्याने त्यांच्या अंत्यविधीला येण्यास मज्जाव होतो,कोरोनाच्या नावाखाली होणा-या रूग्णांचे अवयवाचे आरगॉन काढून विकल्या जात असल्याचा गोरखधंदा सुरू असल्याची ती व्डीहीआे क्लीप होती.
महानगरात कोरोनाच्या नावाखाली साधारण आजार असलेल्या रू्गणासाठी मृत्यूचे आैषधोप्रछार करून त्यातील किडणी,नेत्र,हद्य यासह अन्य मौल्यवान पार्ट काढून ते विकणारी टोळी स्रक्रीय असल्याची सत्यता पटवून देणारी ती व्हीडीआे क्लीप,आणि इतरत्र पोस्ट करून जनजागृती करण्याचे आवाहन करणारी त्यातील हाक.अशा प्रकारच्या क्लीपने मात्र समाजमन सुन्न करण्याचे काम सुरू आहे.क्षणभर चांगल्या मानसालाही विचार करायला लावते.या क्लीपची सत्यता काय?,त्यामागील हेतू काय?त्यात किती सत्यता?असे प्रश्न अनेकाला भेडसावत असेल. अनेकांची हीच अवस्था झाली असेल,अशा वेळी अधिकृत यंत्रणेकडून याचा खुलासा होणे गरजेचे आहे.किंवा सोशल मिडीयावर कोरोनाविषयीच्या व्हीडीआे –आडीआे पोस्ट फेक असेल तर त्याला वेळीच आळाच घालणे समाजहिताचे आहे.
कोरोनाने जगण्याला छळले असतांना त्यात समर्थपणे जगण्यासाठी मानसिक आधार,व बळ देणा-या दोन शब्दाची,सल्ल्याची गरज आहे.कोरोना कधी संपेल कुणीच सांगू शकत नाही.पण त्यात कसे जगायचे?याची सल्लामसलत तर होऊ शकते.जगण्यासाठी त्यांना काम धंद्याविषयीचे मार्गदर्शन देणारी अर्थात युध्दात सर्वस्व गमावलेल्या सारखी स्थीती झालेल्या मानसाला जीवनात पुन्हा तटस्थपणे उभे होण्यासाठीचे शाब्दीक बळ अर्थात सकारात्मक आधार देण्याची गरज आहे.