मनाची व्याप्ती

‘मन’ आहे तरी काय?

आज माझे मन रमत नाही,मन कसे उदास वाटते,किंवा मन कुठेच लागत नाही,असे शब्द आपण नेहमीच ऐकतो.मनात चलबिचल होत असेल तर ते स्थीरही नसते.मनाची अवस्था ठिक नसेल तर आनंदी राहणेही कठीण. आपले सुख-दुख हे मनावर अवलंबून आहे. मन प्रसन्न तर आपल्यात प्रचंड उत्साह,या उत्साहाच्या भरात मग डोंगरही चढून जाण्याची ताकत प्राप्त होते. सर्व गोष्ठी मनावर आहे.एखादे शिखर गाठायचे असेल तर बी पॉझिटिव्ह,असा सल्ला मिळतो.मन सकारात्मक दिशेने प्रतिसाद देतो तेव्हा डोंगराएवढे दुखही लहान वाटते.मनाची साथ नसेल तर मुंगीएवढेही दुख डोंगरासारखे वाटते.

आपल्या शरिरावर,इंद्रीयावर आणि हालचालीवर परिणामकारक ठरणारे मन आहे तरी काय?असा प्रश्न उपस्थीत होतो.मन हे न दिसणारा इंद्रिय,तो शरीराचा कोणताही अववय नाही. जसे फुफ्पूस,हदय,डोळे,कान,मेंदू हे दिसणारे अवयव आहे.रक्तदाब वाढला की त्याचा परिणाम हदयावर पडतो.मानसिक त्रास वाढला की,त्याचा परिणाम डोक्यावर पडतो.आणि डोळे व कानावरही होणारा परिणाम दिसून येतो.परंतू मनावर असा प्रत्यक्ष परिणाम दिसून येत नाही.त्यामुळे मनाचा जितका खोल विचार करू ते डोके चक्रावल्याशिवाय राहणार नाही. आज विज्ञानाने झेप घेतली आहे.पण मनाच्या कप्प्यापर्यंत कधी पोहचता आले नाही.

मेंदू आणि मनाचा संबंध असतो,असे कुठेतही वाचले.मन हे निश्चीत सांगणारे अवयव नसले तरी ते मानवाला अस्वस्थ करणारे आहे.मनाची अवस्था जाणून घेण्यासाठी मी अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न केला.त्यातून जाणीव व बुध्दी यांच्यामुळे घडणा-या ज्ञान ,विचार,स्मरणशक्ती,भावना,कल्पनाशक्ती ,तर्कशक्ती ,चेतना यासह ज्ञिनासा यागोष्टी ज्या ठिकाणी होतात,अर्थात ज्या पटलावर होतात त्याला मन असे म्हणतात.या सर्व गोष्टीचा संबंध हा मेंदूव्दारे होणा-या प्रक्रीयेवर अवलंबून आहे. मेंद्रू मध्ये एखादा विचार घोळत राहिला.त्याचे रूपांतर चिंतेत झाले तर त्याचे परिणाम हार्टवर होते,अशा वेळी तुमचे मनही स्वस्थ राहत नाही,त्यातून तुमच्या हालचाली ही उत्साही नसते. अगदी अवती-भवती होणा-या सुख-दुखद घटनाचे परिणाम मेंदूव्दारे होऊन ती प्रक्रीया मनाव्दारे प्रकट होते.आपले जवळचे रक्ताचे नातेवाईकच नव्हे तर काल-परवा भेटून गेलेला मित्र-मैत्रिण अपघाती मरण पावल्यास त्याचा भाव मनाव्दारे प्रकट होते.मग एक-दोन दिवस आपले उदासवाने जाते.तिच्या आठवणीत अधिक भाऊक होऊन जातो,असे मला वैयक्तीक रित्या वाटते.

अनेकदा आपल्याला दोन मन असल्याची अनुभती व्यक्त होते. झोपेतही मन कार्यरत असते.एखाद्या गोष्टी,व्यवहार,निर्णयाच्या वेळी मनाची घालमेल सुरू असते.अशा वेळी आपल्यालाच दोन मनाची साद ऐकू येते. त्याला आपण बाह्य मन व अंतर्मन असे संबोधू या.बाह्य मन हे नेहमीच चंचल असते.त्याच्यावर अवती-भवती घडणा-या घटनांचा तात्काळ परिणाम पडत असतो.हे मन भुरळाला बळी पडणारेही असते.परंतू अंतर्मन हे स्थीर असते.अचंचल असते.ते कोणत्याही भावनांना ,स्वार्थाला बळी पडणारे नसते.त्यामुळे नेहमी अंर्तमनाची हाक ऐकावी,असा सल्ला दिला जातो.काही स्तब्ध राहून, अंतर्मनाचे ऐकून घेतलेला निर्णय हा योग्य ठरतो.असा जवळपास सर्वांचाच अनुभव आहे.मनात चालणा-या भावनाच्या खेळांमुळेच मनाच्या अवस्थेचे प्रकार पडले आहे. चेतन मन म्हणतात.अवचेतन मन,अचेतन मन,आदी त्यातील प्रकार होय. दैनंदिन जीवनात आपण नेहमी अनुभवतो, कुणाचे मन फार कठोर तर कुणी फारच हळव्या मनाचे असतात .

मनाची शक्ती आेळखून संतानी ‘मन करा रे प्रसन्न’ असा उपदेश केला.मनाच्या सुदृढतेमुळे हडकुळ्या शरीरात शक्ती संचारते.मृत्यू डोळ्यासमोर असूनही तो धडपड करून त्यावर मात करतो.असे कितीतरी मनाची अवस्था आपल्याला सांगता येईल.त्यामुळे मनाला आपण येथेच थांबवू आणि काबू करू.कारण मनाची व्याप्ती अपार आहे.

2 thoughts on “मनाची व्याप्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami