स्वातंत्र्य आणि आपण

आज आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय.प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहो,हे आपले सौभाग्य.स्वातंत्र्य भारतातील ही पिढी खरोखरच धन्य आहे.आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखतो आहे.त्यासाठी देशातील शुरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले.स्वातंत्र चळवळीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहृती दिली.कुणी आपला मुलगा,भाऊ, पिता,गमावला,तर कित्येक महिलांचे कुंकू पुसल्या गेले.भारताला गुलामगिरीतून मुक्त करणे,अर्थात देशातील प्रत्येकाला परकियांच्या जुलूमातून मुक्त करणे,या एकच ध्येयानी स्वातंत्रवीर पेठून उठले.आणि क्रांतीची मशाल पेटविली. या स्वातंत्र्य चळवळीत प्रत्येकांनी आपापला खारीचा वाटा उचलला. या स्वातंत्र्याच्या चळवळीतील महिलांचे योगदान वाखाण्याजोगे आहे.साहित्यीक,थोर,विद्यार्थी आणि स्वातंत्रवीर या सर्वांच्या प्रयत्नांनी देशाला 15 आगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले. झेंड्यावर तिरंगा फडकतांना पाहून वीरांच्या डोळ्यातून आेघळणारे अश्रू ब-याच भावना बोलून जातात. आजही निवडक स्वातंत्र्य सैनिक हयात असतील.त्याच्याविषयीची स्वातंत्र गाथा आजही स्फूर्ती देणारी आहे. देशाला स्वातंत्र्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली.त्यामुळे त्या किंमतीचे मोल जोपासणे स्वातंत्र्य भारतातील पिढीचे आद्य कर्तव्य आहे.स्वातंत्र्यासाठी सोसावे लागलेले घाव,त्याच्या वेदना आज नव्या पिढीला न कळणा-या आहे. स्वातंत्र्य व प्रजासत्ताक या दोन राष्ट्रीय सणाला देशभक्तीचे प्रदर्शन होते.युवापिढीतर यात फारच उत्साही दिसून येते.तर अनेक जण सु्टटी मिळाली म्हणून आनंद साजरा करीत असतो.राष्ट्रीय सण आपापल्या परीने साजरा करीत असतो.ध्वजारोहणापुरती देशभक्ती,देशाप्रती प्रामाणिक भावनांची प्रचिती येते.

आज देशामधील एकंदरीत वातावरण पाहिले तर ,स्वातंत्र्य म्हणजे काय?असा हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. स्वातंत्र भारतात नागरिकांना हक्क व अधिकार मिळाले.मनाप्रमाणे स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे युवा पिढी उच्च शिक्षित झाली.उच्चस्थ हुद्दावर पोहचली आहे.हाती अधिकार असल्याने भारतसुपुत्राकडून नागरिकांचे हित व कल्याण अपेक्षित असते.परंतू टोकावरचा नव्हे तर शेतकरी,आदिवासी,गोरगरीब वर्ग आपल्या हक्कापासून वंचित ठरला आहे.त्याचे कल्याण कसे होईल? याचे नियोजन करण्यापेक्षा अपवाद वगळता ,समाज आणि देशापेक्षा माझे कसे भले होईल.यांचाच अधीक विचार केला जातो आहे.त्यामुळे आज भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी शेवटच्या माणसाच्या कल्याणाच्या योजना,त्याचे अधिकारावर गदा आणणारी ठरत आहे.

आजही दुर्गम,आदिवासी आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वातंत्र दिनात मोकळा श्वास घेता येत नाही,असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दररोज मजुरी करणे,आणि हाती पडलेल्या पैशातून गुजराण करणे एवढेच त्याचे आयुष्य. या देशाचे तेही नागरिक ,त्यामुळे स्वातंत्र भारतात त्यांचाही तेवढाच हक्क.परंतू त्याचे हक्क ,स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे,याचे कुणाला सोयर सुतक नाही.

देशात लोकशाही आहे. भारत देशात जगातील मोठी लोकशाही नांदत आहे.हे आपले सौभाग्य. या लोकशाहीत लोकांचे राज्य.येथील जनता राजा तर लोकप्रतिनिधी हे त्याचे सेवक ही लोकशाहीची व्याख्या.परंतू आज विपरीत स्थीती निर्माण झाली आहे.निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी हा राजा तर दिनदुबळी जनता सेवक,नोकर अशा भीषण परिस्थीतीमुळे गोरगरीब जनता भरकटत आहे.लोकप्रतिनिधीच भारी होऊन त्यांना लोकांना भेटण्याची सवड नसते.त्याला भेटण्यासाठी कित्येक तास प्रतिक्षा करावी लागते.देशातील लोकप्रतिनिधीनी आपल्या सोयीनुसार लोकशाहीची व्याख्या तयार केली आहे. निवडुण आल्यावर मी म्हणजे राजा.आणि सत्तेत असतांना तिन पिढ्या खाईल एवढी माया जमा करणे.हाच एकमेव उद्देश दिसून येतो.गोरगरिबांच्या नावावर विविध योजना सुरू करण्यात येते.गावातील विकास कामे हाती घेतात.आणि त्यातील अधिक मलिंद्यावर डल्ला मारण्याचे काम या देशात होत आहे.त्यामुळे विविध जनकल्याणाच्या योजनाचा फायदा गरजूंना मिळण्याऐवजी इतरांना जास्त पदरात पाडून घेत असतात.याचा नुकताच प्रत्यय कोरोनामुळे देशोधडीला पडलेल्या गोरगरिबांना पुरविण्यात आलेले डब्बे व राशन किटमधून आला.त्यामुळे अनेकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे.देशात टाळूवरचे लोणी खाणा-याची संख्या कमी नाही. त्यामुळे व्यवस्था ही बिघडली आहे .

देशात सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. श्रीमंत-गरीब, विकसित-अविकसित भाग यातील दरी वाढून विषमता जन्म घेत आहेत, त्यामुळे जे सामाजिक प्रश्‍न निर्माण होतात त्यावर गांभीर्यानेे विचार होणे आवश्यक आहे.

पुस्तकांच्या पहिल्याच पानावर असलेली प्रतिज्ञा आम्ही शिकलो.भारत माझा देश आहे.सर्व भारतीय माझे बांधव आहे.परंतू समानता आणि बंधुभावाची भावना लोप पावली आहे. त्यामुळे आज आपल्या देशाला सर्वात जास्त आवश्यकता आहे ह्या भावनात्मक शुद्धीकरणाची.स्वातंत्र्यानंतर पुन्हा परत सोन्याचा धूर निघेल अशी अपेक्षा स्वातंत्र्यवीरांची होती.परंतू ती फोल होतांना दिसत आहे. देश आज अनेक भीषण समस्यांच्या गर्तेत सापडला आहे., गरिबी, अस्वच्छता, पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव, बेकारी, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या या समस्यांचे आव्हान देशापुढे ढाकले आहे. देशाचा नियोजित विकास आणि स्वातंत्र्य भारतात सर्वच घटनांना न्याय व विकासाचा लाभ होण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वात सशक्त,आणि काहीशी ताठर व लवचिक राज्यघटना दिली आहे. परंतू राज्यकर्त्यांकडून प्रामाणिक अमलबजावणी न झाल्याने आज स्वातंत्र्य भारतात अनेक घटक उपेक्षित आहे.असमानता आणि आर्थीक दरी निर्माण होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहृती दिली.त्यांना आजचे देशातील चित्र पाहून नक्कीच दु:ख होत असेल.

देशातील ही स्थीती बदलविण्याची शक्ती ही तुमच्या अन आमच्यात आहे.विशेषता युवावर्गावर आहे. यासाठी युवक हे ज्वाज्वल असायला हवे,त्यांना आयुष्याच्या पुन्हा मशाली पेटविण्याची गरज आहे.अन्यथा येणारी आपलीच पिढी आपल्याला माफ करणार नाही.तरूण पिढीने वैयक्तीक पातळीवर प्रयत्न केले तर भारताला समस्यांपासून दुर ठेवू शकतो.आणि मगच आपण भारत स्वातंत्र झाला.असे म्हणू शकतो.देशाच्या प्रगतिसाठी मी एकटाच का लढू ही विचारसरणीच देशाला मारक ठरते आहे.देशाला थोर पुढा-यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी प्रत्येकालाच कर्तव्य जोपासण्याची गरज आहे.ते मतदानातून .केवळ मतदानाच्या वेळी अप्रामाणिक नेत्यांमुळे देशाचे पर्यायाने आपले भविष्य अंधारात टाकण्यापेक्षा तटस्थ रहा,कुठल्याही आमिषाला बळी पडू नका.आणि मतदानाच्या शस्त्रातून भ्रष्टांना धडा शिकवा.तेव्हाच कुठे टोकावरच्या माणसाला स्वातंत्र्याचा अर्थ कळेल. भारत हा माझा देश आहे. माझा म्हणून मी त्याची काळजी घेईन एवढे जरी वाटले तरी स्वातंत्र्याचा अर्थ कळेल.फक्त आवश्यकता आहे ती तुमच्या निर्धाराची.

One thought on “स्वातंत्र्य आणि आपण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami